मुंबई : क्रिकेटविश्वात दररोज अनेक विक्रम बनत असता आणि मोडलेही जातात. असाच विक्रम श्रीलंकेच्या एंजलो परेराने केला आहे. पण हा साधासुधा विक्रम नाही. या पठ्ठ्याने सामन्याच्या दोन्ही डावात द्विशतकी कामगिरी केली आहे. श्रीलंकेचा फंलदाज एंजलो परेराने प्रथम श्रेणी सामन्यात खेळताना ही विक्रमी खेळी केली आहे. परेराने सामन्याच्या दोन्ही डावात द्विशतक केले आहे. क्रिकेट विश्वात एकाच सामन्यात दोन वेळा द्विशतक करण्याची ही दुसरीच घटना आहे. क्रिकइंफो या वेबसाईटनुसार याआधी १९३८ ला इंग्लिश काउंटी केंटचे बॅट्समन आर्थर फेग यांनी एसेक्सविरुद्ध एका सामन्याच्या दोन डावात अनुक्रमे २४४ आणि २०२ रनची खेळी केली होती.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रीलंकेच्या प्रथम श्रेणी क्लब असलेल्या नोनडेस्क्रिप्टस क्रिकेट क्ल्ब (एनसीसी) या टीमकडून खेळताना परेराने श्रीलंकेच्या प्रथम श्रेणी प्रिमिअर लीगच्या आठव्या स्टेजच्या सामन्यात सिंहली क्रिकेट क्लब (एससीसी) विरुद्ध ही खेळी केली आहे. हा सामना ४ दिवसांचा होता. परेराने या सामन्याच्या पहिल्या डावात २०३ बॉल खेळत २०१ रन केल्या. तर दुसऱ्या डावात २६८ बॉलमध्ये २३१ रनची खेळी केली.


 



एंजेलो परेरा 


श्रीलंकेचा २८ वर्षीय एंजेलो परेरा हा अष्टपैलू खेळाडू आहे. आतापर्यंत परेराने श्रीलंकेकडून ४ एकदिवसीय आणि २ टी-२० सामने खेळले आहेत.