पुणे : महाराष्ट्र केसरी स्पर्धेत महिलांचा प्रदर्शनीय सामना दोन्ही महाराष्ट्रीयन स्पर्धकांमध्ये झाला.


(व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आळंदीची आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू अंकिता गुंड आणि इंदापूरची राष्ट्रीय खेळाडू हर्षदा जाधव यांच्यामध्ये हा सामना रंगला. 


या लढतीमध्ये अंकिता गुंडनं एका मिनिटाच्या आतच हर्षदा जाधवला चितपट करत विजय मिळवला. 


दरम्यान, अंकिता आशियाई कॅडेट कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक आणि ३ वेळा जागतिक कॅडेट कुस्ती स्पर्धेत सहभागी झालीय. तर ९ वेळा राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक मिळवलंय. 


हर्षदा जाधवनं मागील तीन वर्ष राष्ट्रीय स्पर्धेत २ गोल्ड, १ सिल्वर पटकावलंय. ग्रामीण राष्ट्रीय स्पर्धेत एक गोल्ड पटकावलंय.