मुंबई : टीम इंडियाच्या नव्या प्रशिक्षकाची निवड आज संध्याकाळपर्यंत व्हायची शक्यता आहे. सुप्रीम कोर्टानं नियुक्त केलेल्या बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीचे अध्यक्ष विनोद राय यांनी तसे आदेश सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्ही.व्ही.एस लक्ष्मण यांच्या सल्लागार समितीला दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सचिन, सौरव आणि लक्ष्मण यांच्या सल्लागार समितीनं काल टीम इंडियाच्या नव्या प्रशिक्षकपदासाठी मुलाखती घेतल्या. यानंतर कॅप्टन विराट कोहलीशी बोलल्यावर अंतिम निर्णय घेण्यात येईल, असं सौरव गांगुली म्हणाला होता. त्यामुळे आता आजच सल्लागार समिती विराट कोहलीशी बोलून नव्या प्रशिक्षकाच्या नावाची घोषणा करेल, असं बोललं जात आहे.


टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी रवी शास्त्री आणि वीरेंद्र सेहवागच्या नावाची चर्चा आहे. प्रशिक्षकपदासाठी सचिन तेंडुलकर आणि विराट कोहलीची रवी शास्त्रीच्या नावाला पसंती आहे तर सौरव गांगुली मात्र वीरेंद्र सेहवागविषयी आग्रही आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.