मुंबई : भारतीय सल्लागार समितीने गुरुवारी भारतीय संघाच्या निवड समितीत आणखी 3 सदस्यांची निवड केली. माजी क्रिकेटपटू मदन लाल, आरपी सिंग आणि सुलक्षणा नाईक यांच्या तीन सदस्यीय समितीने तीन नवीन निवडकर्त्यांचे नाव निश्चित केले. माजी गोलंदाज चेतन शर्मा, अबे कुरुविला आणि देबाशिष मोहंती यांना निवड समितीमध्ये स्थान देण्यात आले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुरुवारी भारतीय क्रिकेट सल्लागार समितीने नवनिर्वाचित निवड समितीत चेतन शर्मा यांचा समावेश केला. अनुभव आणि ज्येष्ठतेच्या दृष्टीने समितीनेही मुख्य निवडक म्हणून त्यांचे नाव सुचविले. अध्यक्ष म्हणून चेतन शर्मा यांचे नाव निवडण्याचा प्रस्ताव सल्लागार समितीने मांडला होता.


बीसीसीआयनं नव्या निवड समितीची घोषणा केली. ज्यात त्यांनी माजी गोलंदाज चेतन शर्मा यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलीय. तर मुंबईच्या अॅबी कुरूविलालाही संधी देण्यात आलीय. तसंच देबाशिष मोहंतीचीही वर्णी लागलीय. तर गेल्या निवड निवड समितीतल्या सुनील जोशी आणि हरविंदर सिंग यांनाही नव्या निवड समितीत स्थान देण्यात आलंय. 


बीसीसीआयने ट्विटरद्वारे ही माहिती दिली, तसेच ही बाब माध्यमांशीही शेअर केली. सल्लागार समितीने मेलद्वारे निवडलेल्या तिन्ही सदस्यांची नावे जाहीर केली.