कोण आहे मराठमोळी सुरेखा यादव? नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्याचं मिळालं निमंत्रण...जाणून घ्या

भाजप नेते नरेंद्र मोदी यांच्या शपथ विधी समारंभात अनेक लोकांना आमंत्रण देण्यात आलं आहे. यावेळी अशा लोकांना बोलवण्यात आलं आहे ज्यांनी असं काही काम केलं जे चर्चेत राहिलं. यात आशियाची पहिली महिला लोको पायलटचं देखील नाव आहे. 

| Jun 08, 2024, 17:08 PM IST
1/7

पहिल्या महिला लोको पायलट

भारतीय रेल्वेच्या लोको पायलट सुरेखा यादव या मोदींच्या शपथ विधी समारंभात सहभागी होणार आहेत. त्या फक्त भारत नाही तर संपूर्ण आशियात देखील पहिल्या लोको पायलट आहेत. मध्य रेल्वेनं शुक्रवारी सुरेखा यादव यांनी हे आमंत्रण पाठवलं आहे. 

2/7

पीएमओकडून आमंत्रण

रेल्वेच्या प्रवक्त्यांनी याविषयी सांगितले की पीएमओकडून शपथ विधी समारंभात सहभागी होण्यासाठी रेल्वेच्या 10 लोको पायलट यांना आमंत्रण मिळालं आहे. त्यातील एक सुरेखा यादव आहेत. 

3/7

वंदे भारत ट्रेन

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या सोलापुरपर्यंत अशी सुरेख यादव वंदे भारत ट्रेन चालवतात. 

4/7

कशी झाली करिअरची सुरुवात?

सुरेखा यादव यांचं खरं नाव सुरेखा भोसले आहे. त्या साताऱ्याच्या राहणाऱ्या आहेत. तर त्या देशातल्या पहिल्या महिला लोको पायलट असून त्यांनी करिअरची सुरुवात 1988 मध्ये केली. त्या रेल्वे चालवणाऱ्या सगळ्यांना ट्रेन ड्रायव्हर असे म्हणायचे आता ते नाव बदलून लोको पायलट केलं आहे. 

5/7

लग्न आणि मुलं...

सुरेखा यादव यांच्या पतीचं नाव शंकर यादव आहे. ते महाराष्ट्र पोलिस इन्स्पेक्टर आहेत. त्याच्यासोबत लग्न केल्या नंतर सुरेखा भोसले या सुरेखा यादव झाल्या. सुरेखा आणि शंकर यांना दोन मुलं आहेत. 

6/7

अनुभवी लोको पायलट!

सुरेखा यांनी लग्झरी ट्रेन डेक्कन क्वीन चांगल्या पद्धतीनं चालवली आहे. खास पर्यटकांसाठी असलेली ही ट्रेन महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या पश्चिम घाटांचं सुंदर निर्सग रम्य ठिकाणं दाखवून जाते. अशा ठिकाणी फक्त अनुभवी ड्रायव्हरांची ड्यूटी असते.

7/7

आता काय करतात?

सुरेखा यादव यांना त्यांच्या या स्किल्समुळे अनेक राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार मिळाले आहेत. रेल्वेकडून त्यांना अनेक मोटिवेशन्ल कार्यक्रमांमध्ये पाठवण्यात आले आहे. त्या आता कल्याणमध्ये रेल्वे ड्रायव्हर ट्रेनिंग स्कूलमध्ये सीनियर इंस्ट्रक्टर आहेत.