लाईफस्टाइल कितीही बदलली तरी वाढणार नाही शरिरातील युरिक अ‍ॅसिड; फक्त रोज करा 'या' एका भाजीचं सेवन

शरिरात युरिक अॅसिडचं प्रमाण वाढल्यास हायपरटेंशन, ह्रदयाशी संबंधित आजार, मूतखडा अशा अनेक आजारांचा सामना करावा लागतो.   

Jun 08, 2024, 18:07 PM IST

शरिरात युरिक अॅसिडचं प्रमाण वाढल्यास हायपरटेंशन, ह्रदयाशी संबंधित आजार, मूतखडा अशा अनेक आजारांचा सामना करावा लागतो. 

1/9

शरिरात युरिक अॅसिडचं प्रमाण वाढल्यास हायपरटेंशन, ह्रदयाशी संबंधित आजार, मूतखडा अशा अनेक आजारांचा सामना करावा लागतो.   

2/9

चुकीची लाईफस्टाइल आणि खाण्याच्या सवयी यामुळे निर्माण होणाऱ्या या समस्या डाएटमध्ये काही गोष्टींचा समावेश करत सोडवल्या जाऊ शकतात.   

3/9

याशिवाय तुम्ही जर तुमच्या डाएटमध्ये एका पानाचा समावेश करुन घेतला तर युरिक अॅसिडचं प्रमाण कमी करण्यात मदत होऊ शकते.   

4/9

युरिक अॅसिडचं प्रमाण कमी करण्यात कोथिंबिर फार फायदेशीर ठरु शकते. त्यात अनेक पोषकतत्वं असतात जी युरिक अॅसिड कमी करण्यासाठी ओळखली जातात.   

5/9

कोथिंबीरचं सेवन नेमक्या कोणकोणत्या प्रकारे केलं जाऊ शकतं याबद्दल जाणून घ्या.   

6/9

सकाळी रिकाम्या पोटी कोथिंबीरचा चहा पिणं आरोग्यासाठी चांगलं आहे. यासाठी मूठभर कोथिंबीर 2 कप पाण्यात टाकून जवळपास 10 मिनिटं उकळा.   

7/9

यानंतर हे पाणी गाळून रिकाम्या पोटी प्या. चव वाढवण्यासाठी तुम्ही यामध्ये लिंबूचा रस आणि मधही मिसळू शकता.   

8/9

तुम्ही कोथिंबीरच्या पानांची चटणीही बनवू शकता. यासाठी 1 मूठ कोथिंबीर घ्या, त्यात 1 टोमॅटो, 2 ते 3 हिरव्या मिरच्या आणि थोडंसं मोठी मिसळून वाटून घ्या.   

9/9

अशाप्रकारे कोथिंबीरचं सेवन करुन तुम्ही युरिक अॅसिडवर नियंत्रण मिळवू शकता.