मुंबई : भारताचा कर्णधार विराट कोहलीने दिलेले फिटनेस चॅलेंज अनुष्का शर्माने स्वीकारलंय. क्रीडा मंत्री राज्यवर्धन राठोड यांनी विराट कोहलीला फिटनेसचे चॅलेंज दिले होते. हे चॅलेंज पूर्ण केल्याचा व्हिडीओ विराटने  ट्विटरवर पोस्ट केला होता. तसेच त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अनुष्का शर्माला त्याने चॅलेंज दिले होते. अनुष्काने हे चॅलेंज पूर्ण केले असून तिने पुढील चॅलेंज तिची मैत्रीण आणि स्क्वॉशपटू दीपिका पल्लिकल आणि अभिनेता वरुण धवनला चॅलेंज केलंय. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राठोड यांनी काही दिवसांपूर्वी 'हम फिट तो इंडिया' या हॅशटॅगने फिटनेस चॅलेंजला सुरुवात केली होती. ट्विटरवर अपलोड करण्यात आलेल्या या व्हिडीओत ते आपल्या ऑफिसमध्येच वर्कआऊट करत असल्याचे दिसले होते. त्यांनी याबाबत आपल्याला पंतप्रधान मोदींनीकडून उर्जा मिळत असल्याचे म्हटले होते. जेव्हा मी पंतप्रधान मोदींना भेटतो तेव्हा त्यांच्याकडून प्रेरित होतो. त्यांच्यात जबरदस्त उर्जा आहे. ते दिवस रात्र काम करतात. संपूर्ण भारत फिट व्हावा अशी त्यांची इच्छा आहे. त्यांच्यामुळेच मी प्रेरित होऊन हा व्हिडीओ बनवलाय.