मुंबई : विराट कोहलीला पुन्हा एकदा मैदानात पराभवाचा सामना करावा लागला. धोनीच्या नेतृत्वात चेन्नईने बंगळुरूचा 6 विकेटने पराभव केला. खराब फिल्डिंगमुळे विराट खूप निराश दिसत होता. बंगळुरूने 128 रनचं टार्गेर चेन्नई समोर ठेवलं होतं जे चेन्नईच्या 18 ओव्हरमध्ये 4 विकेट गमावत पूर्ण केलं. या सामान्या दरम्यान एक गोष्ट कॅमेऱ्यात कैद झाली. अनुष्का शर्मा समोर बसलेल्या एका तरुणीच्या मोबाईल मध्ये डोकावत होती. हा फोटो सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. एकीकडे विराटचा संघ पराभवाच्या उंभरट्यावर होता आणि अनुष्काचं लक्ष त्या मोबाईलमध्ये होतं.


कोण होती ती तरुणी


अनुष्काच्या समोर बसलेली आणि मोबाईल हाताळत असताना अनुष्काचं जिच्या मोबाईलमध्ये लक्ष होतं ती क्रिकेटर मंदिप सिंहची पत्नी आहे. जगदीप जैसवाल असं तिचं नाव आहे. चेन्नईला सपोर्ट करण्यासाठी ती नेहमी मैदानावर येत असते. पण यंदा अनुष्कामुळे तिच्याकडे सगळ्यांचं लक्ष वेधलं गेलं.