विराट इथे पण अनुष्का कुठे? `विरुष्का` सहकुटुंब परदेशात स्थायिक होण्याच्या तयारीत, देशही निवडला?
Virat Kohli Anushka Sharma : दुसऱ्या मुलाचा जन्म झाल्यापासून अभिनेत्री अनुष्का शर्मा माध्यमांसमोर आलेली नाही. किंबहुना अनुष्का भारतातच नाही.
Virat Kohli Anushka Sharma : भारतीय क्रिकेट संघात एकेकाळी कर्णधारपद भूषणवणारा आणि त्यानंतर आपल्या अष्टपैलू कामगिरीनं क्रिकेटचं मैदान गाजवणारा विराट कोहली गेल्या काही काळापासून त्याच्या कुटुंबालाच वेळ देताना दिसला. इतकंच काय, तर कुटुंबाखातर त्यानं देशही सोडला होता. दरम्यानच्या काळात विराटची पत्नी, अभिनेत्री अनुष्का शर्मानं एका मुलाला जन्म दिला आणि या क्रिकेटपटूनं सोशल मीडियाच्या माध्यमातून ही गोड बातमी चाहत्यांना दिली.
अकाय (Akaay), या मुलाच्या जन्मापासून किंबहुना त्याच्या जन्माच्या आधीपासूनच विरुष्का United Kingdom / लंडनमध्ये वास्तव्यास होते. सूत्रांच्या माहितीनुसार जवळपास मागील पाच महिन्यांपासून विराट आणि त्याचं हे कुटुंब तिथंच आहे. सध्या मात्र विराट भारतात परतला आहे. पण, विराट मुंबईत दाखल झाला असला तरीही त्याच्यासोबत अनुष्का किंवा लेक वामिका (Vamika) आणि मुलगा अकाय मात्र कुठंही दिसले नाहीत. थोडक्यात अनुष्का आणि विराटची मुलं त्याच्यासोबत भारतात आलेली नाहीत.
कोहली कुटुंबाला पाहिल्यानंतर सध्या विराट इथे, पण अनुष्का कुठे? असाच प्रश्न उपस्थित केला जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार सध्या अनुष्का- विराट त्यांच्या मुलांसह लंडनमध्येच स्थायिक होण्याचा विचार करत असल्याचं म्हटलं जात आहे. सोशल मीडियावर काही नेटकऱ्यांनी विराटच्या व्हायरल होणाऱ्या फोटोंवर त्या आशयाच्या कमेंटही केल्या आहेत.
हेसुद्धा वाचा : Home Loan आणखी स्वस्त; 'या' बँकेच्या ग्राहकांना मिळणार फायदा, पाहा काय आहे संपूर्ण प्रक्रिया
विराट आयपीएलसाठी (IPL 2024) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघासोबत सराव करण्यासाठीही सज्ज झाला आहे. पण, त्याचं कुटुंब मात्र यावेळी त्याचा प्रत्यक्ष मैदानात साथ देताना दिसणार नाही असंच चित्र पाहायला मिळत आहे. नेटकऱ्यांच्या कमेंट पाहिल्या, तर विराट आयपीएलसाठी परतला असला तरीही भारतीय क्रिकेट संघातून तो हळुहळू काढता पाय घेण्याची शक्यता आहे. काहींनी तर, विराट आणि अनुष्का त्यांच्या मुलांच्या बाबतीत घेत असणाऱ्या भूमिकेचा दाखला देत त्यांना अपेक्षित Privacy भारतात मिळणं अशक्यच, त्यामुळं हे कुटुंब परदेशात स्थायिक होण्याचा विचार करू शकतं ही बाब नाकारता येत नाही.