बंगळूरु : बंगळूरुच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये बुधवारी भारताचा माजी कूल कॅप्टन महेंद्रसिंग धोनी आणि सध्याचा कर्णधार विराट कोहली यांच्यात मैदानी युद्ध पाहायला मिळाले. दोन्ही संघातील मुकाबला चांगलाच रंगला. या हाय स्कोरिंग सामन्यात कधी विजयाचे पारडे धोनीच्या बाजूने झुकत होते तर कधी कोहलीच्या बाजूने विजयाचे पारडे झुकत होते. कधी कोहलीचा डाव भारी पडत होता तर कधी धोनीचा. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विराट आणि कोहली यांच्यातील मुकाबल्याचा आनंद त्यांचे चाहतेही घेत होते. दोन्ही संघामध्ये टशन पाहायला मिळत होती. एकीकडे चाहत्यांचे श्वास रोखले जात असताना दोन्ही कर्णधारांच्या पत्नीच्या हृदयाचे ठोकेही धावागणिक वाढत होते. धोनीने चौकार-षटकार ठोकल्यास त्याची पत्नी साक्षी जोरजोरात टाळ्या वाजवून आनंद व्यक्त करत होती तर चेन्नईचा विकेट पडल्यास अनुष्का संघाला चीअर करत होती. दोघींमध्येही जणू काही न दिसणारे युद्धच सुरु होते. सामना अटीतटीचा होता आणि या सामन्यात चेन्नईने बाजी मारली. बंगळूरुला पाच विकेट राखून पराभवाचा सामना करावा लागला.


अंबाती रायडू(८२)  आणि मॅन ऑफ दी मॅच ठरलेला कर्णधार महेंद्रसिंग धोनी(नाबाद ७०) यांच्या झंझावाती खेळीच्या जोरावर चेन्नई बंगळूरुवर पाच विकेट राखून विजय मिळवला. हा सामना फारच उत्कंठावर्धक ठरला. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये हा सामना रंगला होता. कर्णधार धोनीने महत्त्वपूर्ण खेळी केली. त्याने आपल्या डावात अखेरच्या चेंडूवर षटकार मारत विजय मिळवून दिला. यावेळी वर्ल्डकपच्या अखेरच्या विजयी षटकाराची आठवण आली. 


पॅव्हेलियमध्ये बसल्या होत्या दोघांच्या पत्नी


धोनीची पत्नी साक्षी आयपीएलमधील सगळ्या सामन्यांना हजर असते. तिच्यासोबत तिची मुलगी झिवाही असते. आई-मुलगी मिळून धोनीला चिअर करत असतात.