Anushka Sharma Virat Kohli Visits Ujjain Mahakaleshwar Temple Video : कपाळावर चंदन आणि गळ्यात रुद्राक्षाची माळ घालून विराट कोहली आणि गुलाबी साडी नेसून डोक्यावर पदर घेत अनुष्का शर्मा (Anushka Sharma) महाकालेश्वर मंदिरात नतमस्तक होतोना दिसले. भारत - ऑस्ट्रेलियादरम्यान (India vs Australia) सुरु असलेल्या  बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये माजी कर्णधार विराट कोहलीची जादू ( Virat Kohli Visits Ujjain Mahakaleshwar) दिसली नाही. तिसऱ्या कसोटीतीही तो 35 रन्स करुन आऊट झाला. इंदूरमधील सामना संपल्यानंतर विराट आणि अनुष्का महाकाल ज्योतिर्लिंगाच्या (Ujjain Mahakaleshwar Temple Video) दर्शनासाठी पोहोचले.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उज्जैनमधील या मंदिरात दोघींही मंत्रमुग्ध होऊन पूजा अर्चा करताना दिसून आले. मंदिरातील त्यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. (Anushka Sharma Virat Kohli Visits Ujjain Mahakaleshwar Temple Video Viral on Social media trending now)


विराट (@imVkohli) आणि अनुष्का (#AnushkaSharma) शनिवारी पहाटे महाकाल मंदिरात जाऊन भस्म आरतीमध्ये सहभागी झाले. यानंतर दोघांनीही मंदिराच्या गर्भगृहात जाऊन पंचामृत पूजन अभिषेक केला. विराट आणि अनुष्का अनेक वेळा अध्यात्माक रमताना दिसले आहेत. यावेळीही हे दोघे मंदिरात भक्तीमय झालेले पाहिला मिळाले.



ऑस्ट्रेलिया सीरीजच्या पहिलेही विराट कोहली आणि अनुष्का शर्मा दयानंद सरस्वतीच्या आश्रमात गेले होते. (Dayanand Saraswati Ashram) विराट आणि अनुष्का अनेक वेळा नीम करोली बाबच्या आश्रमात आपल्या वेळ व्यतित करतात. मनशांती आणि भक्तीमय वातावरणात ते कायम रमताना दिसून आले आहेत. 



विराट कोहलीने इंदूर कसोटीच्या पहिल्या डावात 22 तर दुसऱ्या डावात 13 धावा केल्या. दरम्यान नोव्हेंबर 2019 नंतर विराटला कसोटी सामन्यात शतक झळकावता आलेले नाही. त्यामुळे चाहते त्यांचा कसोटीची आतुरतीने वाट पाहत आहेत. पुढच्या सामन्यात तरी विराट शतक ठोकेल अशी आशा चाहत्यांना आहे.