Anushka wished Virat Kohli on his Birthday : बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीची जोडी प्रेक्षकांमध्ये चांगलीच लोकप्रिय आहे. हे दोघं एकमेकांवर किती प्रेम करतात हे त्यांच्या सोशल मीडिया पोस्टपाहून सगळ्यांच्याच लक्षात येते. अनेकदा सोशल मीडियावर ते एकमेकांचे असे काही फनी फोटो शेअर करतात जे पाहून सगळ्यांना आश्चर्य होते. दरम्यान, आज 5 नोव्हेंबर विराटचा वाढदिवस आहे. आज विराट 35 वर्षांचा झाला असून याच निमित्तानं सगळेच त्याला सोशल मीडियावर शुभेच्छा देत असताना. अनुष्कानं देखील त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. अनुष्कानं मस्करी करत विराटला त्याच्या वाढदिवसानिमित्तानं खास शुभेच्छा दिल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनुष्कानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये सगळ्यात आधी तिनं एका बातमीचा स्क्रिनशॉट शेअर केला आहे. यात विराट कोहली हा एकमेव असा खेळाडू आहे जो 'Zeroth' बॉलवर विकेट घेतो. त्यानंतर तिनं विराटचा एक ग्राऊंडवरचा एक फोटो शेअर केला आहे. त्यात विराट मस्ती करताना दिसत आहे. तर तिसऱ्या फोटोत विराट आणि अनुष्का आहेत. ते दोघं या फोटोत आनंदी दिसत आहेत. हे फोटो शेअर करत अनुष्कानं कॅप्शन दिलं की 'आयुष्यात असलेल्या सगळ्या भूमिका तो चांगल्या पद्धतीनं साकारतो! आणि प्रत्येक वेळी तो असं काही करून जातो की वेगवेगळ्या गोष्टींमध्ये कामगिरी करत आहे. या आयुष्यात आणि याच्या पुढे येणाऱ्या सगळ्याच आयुष्यात मी तुझ्यावर प्रत्येक क्षणी, कोणत्याही परिस्थितीत  प्रेम करत राहणार, मग काहीही असो.'



अनुष्कानं शेअर केलेल्या या पोस्टवर विराटनं देखील प्रतिक्रिया दिली आहे. विराटनं या पोस्टवर कमेंट करत डोक्यावर हात मारणारं, लाल रंगाचं हार्ट असे इमोटिकॉन शेअर केले आहेत. दरम्यान, अनुष्कानं शेअर केलेल्या फोटोंवर कमेंट करत नेटकऱ्यांनी अनुष्यकाला आणखी फोटो शेअर करण्याची विनंती केली आहे. 


हेही वाचा : ऐश्वर्यानं Ex-Boyfriend सोबतच्या नात्यावर सोडलं मौन म्हणाली, 'मी ज्या नात्यात होते त्यात...'


दरम्यान, अनुष्का आणि विराटनं 2017 मध्ये लग्न केलं. लग्नानाच्या 4 वर्षांनंतर म्हणजेच 2021 मध्ये अनुष्का आणि विराटनं त्यांच्या मुलीचं स्वागत केलं. वामिकाच्या जन्मानंतर अनुष्का आणि विराटच्या चाहत्यांना खूप आनंद झाला होता. अनुष्का लवकरच 'चकदा एक्सप्रेस' या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट माजी भारतीय क्रिकेटपटू झूलन गोस्वामीच्या जीवनावर आधारीत आहे.