जकार्ता : इंडोनेशियाची राजधानी जकार्तामध्ये आयोजित 18 व्या आशियाई स्पर्धेत भारताची सुरुवात चांगली झाली आहे. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी भारताने कास्य पदकाची कमाई केली आहे. भारताकडून 10 मीटर एयर राइफल मिक्सडमध्ये अपूर्वी चंदीला आणि रवी कुमार यांना कास्य पदक जिंकलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 



शनिवारी 18व्या आशियाई स्पर्धेची ओपनिंग सिरेमनी रंगली. आज विविध स्पर्धांना सुरुवात झाली. भारतीय खेळ प्रेमींसाठी रविवारचा दिवस आनंदाचा ठरला. पुरुष आणि महिला शूटिंग स्पर्धेकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. भारतीय शूटर सुवर्ण पदकसाठी जोरदार प्रयत्न करतील. तीरंदाजी, कबड्डी सह इतर खेळांसाठी ही आज सामने होणार आहे. पुरुष आणि महिला टीममध्ये देखील आज पदकासाठी स्पर्धा रंगेल. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय खेळाडूंना ट्विटरच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत.