लंडन : भारताचा माजी क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरची निवड भारताच्या अंडर-१९ टीममध्ये झाली आहे. श्रीलंकेविरुद्धच्या सीरिजमध्ये अर्जुन भारताच्या अंडर-१९ टीमचा भाग असेल. १८ वर्षांच्या अर्जुन तेंडुलकरची भारताच्या १५ खेळाडूंमध्ये निवड करण्यात आली. याआधी अर्जुन तेंडुलकर भारताचा प्रशिक्षक रवी शास्त्रीसोबत दिसला. बीसीसीआयनं हा फोटो ट्विटरवर शेअर केला. शास्त्रीनं यावेळी अर्जुनला काही सल्ले दिले. तर अर्जुन तेंडुलकरनं आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० मॅचआधी भारतीय टीमला सराव दिला. अर्जुन तेंडुलकर हा डावखुरा फास्ट बॉलर आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय टीमला सराव दिल्यानंतर अर्जुन तेंडुलकर, सचिन तेंडुलकर आणि बीसीसीआयवर टीकेची झोड उठली आहे. अर्जुनला भारतीय टीमसोबत सराव करून देणं म्हणजे वशीलेबाजी असल्याची टीका सोशल नेटवर्किंगवर होत आहे. याआधी इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यानच्या टेस्टमध्ये २०१७ साली लॉर्ड्सच्या मैदानात खेळाडूंना सराव म्हणून बॉलिंग टाकली होती. 



अर्जुन तेंडुलकरच्या सरावाचा व्हिडिओ