Prithvi Shaw: टीम इंडियाचा खेळाडू पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) सध्या चांगलाच चर्चेत आहे. त्याच्या खेळामुळे नव्हे तर यंदा तो एका वादामुळे चर्चेत आला. एका महिला चाहतीला सेल्फी नाकारला आणि तिच्यासोबत केलेल्या बाचाबाचीमुळे पृथ्वी शॉ वादात सापडला. या प्रकरणी पोलिसांनी संबंधित महिला सपना गिल (Sapna Gill) हिला अटक केली आहे. तर दुसरीकडे पृथ्वी शॉच्या जुन्या मित्राने यावेळी त्याला साथ दिली आहे. पृथ्वीचा हा मित्र दुसरा-तिसरा कोणीही नसून अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) आहे. 


पृथ्वीचं नेमकं प्रकरणं काय? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिळालेल्या माहितीनुसार, सपना गिल या महिलेने पृथ्वीसोबत सेल्फी काढला. यावेळी तिला अजून एक सेल्फी हवा होता, मात्र पृथ्वीने तिला नकार दिला. यानंतर या दोघांमध्ये बाचाबाची झाली. यावेळी सपनाने पृथ्वीला मारहाण केल्याचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 


अर्जुन तेंडुलकरने दिली पृथ्वीला साथ


पृथ्वी शॉ या प्रकरणात अडकल्यानंतर टीम इंडियातील एकंही खेळाडूने त्याला सपोर्ट केला नाही. मात्र यामध्ये सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने पृथ्वीला साथ दिली आहे. अर्जुनने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली होती. ज्यामध्ये अर्जुनने लिहिलंय की, स्ट्रॉग रहा भावा...चांगल्या आणि वाईट या दोन्ही काळामध्ये मी तुझ्या सोबत आहे.



पृथ्वी शॉ आणि त्या महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल 


या घटनेचे 2 व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेत. यामधील एका व्हिडीओमध्ये या महिला चाहतीसोबत असलेल्या तिच्या मित्राच्या म्हणण्यानुसार, पृथ्वी शॉ आणि त्यांच्या मित्रांनी आम्हाला मारलं. तर दुसऱ्या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये पृथ्वी शॉ आणि सोनेरी रंगाचा ड्रेस घातलेल्या महिलेसोबत बाचाबाची झाल्याचं दिसून येतंय. 


सपना गिलला अटक 


या प्रकरणानंतर पोलिसांनी सपना गिलला अटक केली आणि ताब्यात घेतलं. ओशवरा पोलिसांनी ही कारवाई केली होती. यानंतर तिला कोर्टासमोर सादर करण्यात आलं.