मुंबई : भारतात क्रिकेटचा देव म्हटल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरची निवड अंडर १९ संघात निवड झालीये. अर्जुन तेंडुलकर पुढील महिन्यात होणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या चार दिवसीय सामन्यात खेळताना दिसणार आहे. १८ वर्षीय डावखुरा गोलंदाज अर्जुन गेल्या वर्षी कूच बिहार ट्रॉफीमध्ये मुंबईच्या अंडर १९ संघाकडून खेळला होता यात त्याने १८ विकेट मिळवल्या होत्या. ज्युनियर निवड समितीने येथे झालेल्या बैठकीत श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यांसाठी अर्जुनची संघात निवड केलीये.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्युनियर निवड समितीने येथे झालेल्या बैठकीत श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यांसाठी अर्जुनची संघात निवड केलीये. दरम्यान पाच वनडे सामन्यांसाठी त्याला संघात निवडण्यात आलेले नाही. भारतीय संघ श्रीलंकेत ११ जुलै ते ११ ऑगस्टदरम्यान दोन सीरिज खेळणार आहे. अर्जुनच्या निवडीवर सचिन म्हणाला, अर्जुनची संघातील निवड ही त्याच्या करिअरमधील माईलस्टोन ठरणार आहे. अंजली आणि मी नेहमीच अर्जुनच्या निवडीसाठी पाठिंबा देऊ आणि त्याच्या यशासाठी प्रार्थना करु. 


सोशल मीडियावरही अर्जुनच्या निवडीची चर्चा सुरु आहे. अनेकांनी त्याचे कौतुक केलेय तर काहींनी टीकाही केलीये