कोलंबो : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर सध्या श्रीलंकेविरुद्धच्या अंडर-१९ यूथ टेस्टमध्ये खेळत आहे. या मॅचमध्ये अर्जुन तेंडुलकरला फारसं यश मिळालेलं नाही. ऑल राऊंडर म्हणून अर्जुन तेंडुलकरला संधी मिळाली होती. पण पहिले बॉलिंग करताना अर्जुननं ११ ओव्हरमध्ये एक विकेट घेतली. अर्जुननं त्याच्या दुसऱ्या ओव्हच्या शेवटच्या बॉलला कमील मिशाराला एलबीडब्ल्यू आऊट केलं. यानंतर बॅटिंगला आलेला अर्जुन तेंडुलकर ११ बॉल खेळून शून्य रनवर आऊट झाला. फॉरवर्ड शॉर्ट लेगवर अर्जुनचा कॅच पकडण्यात आला.


सचिनच्या रेकॉर्डशी बरोबरी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अर्जुन तेंडुलकरनं सचिनच्या नकोशा रेकॉर्डशी बरोबरी केली आहे. पहिली वनडे खेळताना सचिन तेंडुलकर शून्यवर आऊट झाला होता. पाकिस्तानविरुद्ध सचिन त्याची पहिली वनडे खेळला होता. या मॅचमध्ये वकार युनूसनं सचिनला शून्य रनवर माघारी पाठवलं होतं. यानंतर सचिनला वनडे टीममधून काढण्यात आलं होतं. दुसऱ्या वनडेमध्येही सचिन शून्यवर आऊट झाला होता. पण त्याच्यावर विश्वास ठेवून सचिनला आणखी संधी देण्यात आल्या आणि मग सचिननं इतिहास घडवला.


श्रीलंकेविरुद्धची दुसरी यूथ टेस्ट २४ जुलैपासून हंबनटोटामध्ये होणार आहे. या टेस्टनंतर वनडे सीरिजही खेळवण्यात येत आहे. पण वनडे सीरिजसाठी अर्जुन तेंडुलकरची निवड झालेली नाही.