कोलंबो : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जवळपास सगळीच रेकॉर्ड स्वत:च्या नावावर करणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या मुलाचं क्रिकेटमध्ये आगमन झालं आहे. अर्जुन तेंडुलकर सध्या श्रीलंकेविरुद्ध अंडर-१९ यूथ टेस्ट मॅच खेळत आहे. या सीरिजमध्ये निवड झाल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. पण अर्जुननं कुच बिहार ट्रॉफीमध्ये चांगली कामगिरी केल्यामुळे त्याची या सीरिजसाठी निवड करण्यात आल्याचं निवड समितीनं सांगितलं. पण श्रीलंकेविरुद्धच्या या मॅचमध्ये अर्जुनला चमकदार कामगिरी करता आली नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑल राऊंडर म्हणून अर्जुन तेंडुलकरला संधी मिळाली होती. पण पहिले बॉलिंग करताना अर्जुननं ११ ओव्हरमध्ये एक विकेट घेतली. अर्जुननं त्याच्या दुसऱ्या ओव्हच्या शेवटच्या बॉलला कमील मिशाराला एलबीडब्ल्यू आऊट केलं. या मॅचमध्ये पहिले बॅटिंगला आलेली श्रीलंकेची टीम २४४ रनवर ऑल आऊट झाली. हर्ष त्यागीनं २६ ओव्हरमध्ये ४ विकेट आणि आयुष बदानीनं ९.३ ओव्हरमध्ये २४ रन देऊन ४ विकेट घेतल्या.


बॉलिंगमध्ये शानदार कामगिरी करणाऱ्या आयुष बदानीनं बॅटिंगमध्येही कमाल दाखवली. आयुष बदानीनं १८५ रनची नाबाद खेळी केली. पण अर्जुन तेंडुलकर मात्र ११ बॉल खेळून शून्य रनवर आऊट झाला. फॉरवर्ड शॉर्टलेगवर कॅच देऊन अर्जुन तेंडुलकर आऊट झाला. बदानीच्या बॅटिंगमुळे भारतानं ५८९ रनचा डोंगर उभा केला.