मुंबई : सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरची मुंबईच्या टीममध्ये निवड झाली आहे. बापुना कपसाठीच्या १५ सदस्यीय टीममध्ये अर्जुनला संधी देण्यात आली आहे. नागपूरमध्ये ५ सप्टेंबरपासून बापुना कपला सुरुवात होणार आहे. विदर्भ क्रिकेट संघाकडून आयोजित करण्यात आलेल्या या प्री-सिझन टुर्नामेंटमध्ये सूर्यकुमार यादव मुंबईचं नेतृत्व करेल. या स्पर्धेमध्ये ५०-५० ओव्हरच्या मॅच खेळवल्या जातील.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१९ वर्षांचा अर्जुन तेंडुलकर डावखुरा फास्ट बॉलर आहे. नुकत्याच झालेल्या मुंबई टी-२० लीगमध्येही अर्जुन तेंडुलकर दिसला होता. मागच्या वर्षी श्रीलंकेविरुद्ध झालेल्या सीरिजमध्ये अर्जुन भारताच्या अंडर-१९ टीमकडून खेळला. ऑलराऊंडर असलेल्या अर्जुनने अनेकवेळा भारतीय टीमला नेटमध्येही सराव दिला आहे.


मुंबईची टीम


सूर्यकुमार यादव (कर्णधार), आदित्य तरे, जय बिस्ता, सरफराज खान, शुभम रंजन, रौनक शर्मा, एकनाथ केरकर, सुफियान शेख, आकाश पारकर, शम्स मुलानी, आदित्य धूमळ, शसांक अर्तडे, आकिब कुरेशी, कृतिक हनगावदी, अर्जुन तेंडुलकर