Arjun Tendulkar Take 9 Wickets : भारताचा माजी दिग्गज क्रिकेटर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमध्ये आपलं नशीब आजमावत आहे. अर्जुन तेंडुलकर गोवा क्रिकेट असोसिएशनकडून देशांतर्गत क्रिकेट खेळत असून सध्या तो त्याच्या गोलंदाजीमुळे चर्चेत आला आहे. अर्जुन तेंडुलकरने तुफान गोलंदाजी करून एक दोन नाही तर तब्बल 9 विकेट्स घेतल्या आहेत. सध्या गोवा क्रिकेट असोसिएशनच्या टीमकडून थिमाप्पिया मेमोरियन टूर्नामेंटमध्ये खेळत असताना त्याने ही कामगिरी केली. KSCA XI विरुद्ध खेळताना त्याने हा कहर केला आणि आपल्या टीमला विजय मिळवून दिला. 


अर्जुन तेंडुलकरचा 'पंच' : 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अर्जुन तेंडुलकरने आपल्या गोलंदाजीने KSCA XI ची फलंदाजी उध्वस्त केली. डाव्या हाताचा वेगवान गोलंदाज अर्जुन तेंडुलकरने 41 धावा करून 5 विकेट्स घेतल्या. अर्जुन तेंडुलकरच्या या गोलंदाजी अटॅकमुळे KSCA XI केवळ 103 धावा बनवू शकली होती. तर गोवा क्रिकेट एसोसिएशनच्या टीमने पहिल्या इनिंगमध्ये 413 धावा केल्या. यात अभिनव तेजरानाने 109 धावांची खेळी केली. तर मंथन खुटकरने 69 धावा केल्या. अर्जुन तेंडुलकर यावेळी केवळ 18 धावांचे योगदान देऊ शकला. 


हेही वाचा : युवराज सिंहने बेस्ट प्लेईंग 11 मध्ये धोनीला केलं इग्नोर, थालाचे फॅन्स भडकले, पाहा VIDEO


दुसऱ्या इनिंगमध्येही अर्जुनची कमाल : 


अर्जुन तेंडुलकरने दुसऱ्या इनिंगमध्ये पुन्हा एकदा आपली चमक दाखवली. KSCA XI टीम केवळ 121 धावांची खेळी. यावेळी अर्जुन तेंडुलकरनेच त्यांचे  सर्वात जास्त नुकसान केले. KSCA XI ने 55 धावा देऊन 4 विकेट्स घेतल्या. अशा प्रकारे अर्जुनने एकूण 9  विकेट्स घेतल्या. अर्जुनने आपल्या परफॉर्मन्सचा व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. गोवा क्रिकेट असोसिएशनच्या टीमने 189 धावांनी हा सामना जिंकला. 



अर्जुनसाठी टीम इंडियाचे दरवाजे उघडणार? 


अर्जुन देशांतर्गत खेळवल्या जाणाऱ्या क्रिकेट टूर्नामेंटमध्ये उत्तम परफॉर्मन्स देत आहे. आता पुढील महिन्यात होणार रणजी सीजन त्याच्यासाठी महत्वाचा असेल. गोवासाठी चांगले प्रदर्शन अर्जुन करता पुढील रस्ते खोलू शकतो. अर्जुनच्या फर्स्ट क्लास क्रिकेट करिअरबद्दल बोलायचे झाल्यास त्याने 13 सामन्यांमध्ये आतापर्यंत 21 विकेट्स घेतल्या आहेत. यासह अर्जुनने रणजी ट्रॉफी सामन्यात एक शतक ठोकलं असून त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 481 धावा निघाल्या आहेत. अर्जुनने येत्या रणजी ट्रॉफीमध्ये उत्तम परफॉर्म केल्यास त्याच्यासाठी भविष्यात टीम इंडियाचे दरवाजे उघडायला वेळ लागणार नाही. सरफराज खान, ध्रुव जुरेल सारख्या अनेक युवा खेळाडूंना टीम इंडियाच्या निवडकर्त्यांनी 2024 मध्ये टीम इंडियाकडून टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी दिली होती.