Arjun Tendulkar : टीम इंडियाचा सर्वात महान खेळाडू सचिन तेंडुलकरच्या मुलाची आयपीएलनंतर मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली. यंदाच्या आयपीएलमध्ये तब्बल 3 वर्षानंतर अर्जुन तेंडुलकर ( Arjun Tendulkar ) ला खेळण्याची संधी मिळाली. या आयपीएलमध्ये ( IPL 2023 ) त्याला 4 सामने खेळण्याची संधी मिळाली. दरम्यान आता अर्जुनच्या नावाची पुन्हा एकदा चर्चा होऊ लागलीये. याच कारण म्हणजे, अर्जुन ( Arjun Tendulkar ) सारख्या हुबेहुब दिसणाऱ्या एका व्यक्तीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. 


कोण आहे हा अर्जुनसारखा दिसणार व्यक्ती


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयपीएलनंतर अर्जुन तेंडुलकरची ( Arjun Tendulkar ) सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणावर चर्चा होत होती. यानंतर आता पुन्हा एकदा अर्जुन सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागलाय आणि याचं कारण आहे तो म्हणजे कार्लोस अल्कारेज ( Carlos Alcaraz ). सोशल मीडियावर आता चर्चा रंगलीये की, कार्लोस अल्कारेज हा हुबेहुब अर्जुन तेंडुलकरसारखा ( Arjun Tendulkar ) दिसतो. 


या दोघांचेही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतायत. या फोटो पाहून चाहते या दोघांनाही एकमेकांसोरखे दिसणारे म्हणतायत. यावर लोकांनी विविध कमेंट्स देखील केल्या आहेत. 


अर्जुनसारका दिसतो कार्लोस


स्पॅनिश टेनिसपटू कार्लोस अल्कारेझने ( Carlos Alcaraz ) नुकतं विम्बल्डन जिंकलं. विम्बल्डनच्या अंतिम सामन्यात नुवान जोकोविचचा अंतिम फेरीत पराभव करून त्याने विम्बल्डनवर कब्जा केलाय. यानंतर कार्लोस अल्कारेझचा ( Carlos Alcaraz ) फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ज्याला पाहून काही चाहत्यांना वाटतंय की, कार्लोस अल्कारेझ भारतीय क्रिकेटर अर्जुन तेंडुलकरसारखा ( Arjun Tendulkar ) दिसतो.


एका ट्विटमध्ये या दोघांचा या फोटोवर लोकांनी प्रतिक्रियाही दिल्यात. यावेळी काही युझर्सच्या म्हणण्यानुसार, कार्लोस अल्कारेझने दाढी ठेवली तर तो हुबेहूब अर्जुन तेंडुलकरसारखा दिसेल. तर एजून एका युझरने म्हटलंय की, तुम्हाला विम्बल्डन चॅम्पियन दिसत असेल, मात्र मला या फोटोत शुभमन गिल आणि अर्जुन तेंडुलकर दिसतायत. 






स्पेनच्या कार्लोस अल्कारेझने यूएस ओपन 2023 पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावलंय. कार्लोस अल्कारेझचा जन्म 5 मे 2023 रोजी स्पेनच्या पालमार, मर्सियामध्ये झालाय. तो वयाच्या चौथ्या वर्षापासून तो टेनिस खेळत होता. यूएस ओपन जिंकून कार्लोस जगातील नंबर 1 पुरुष टेनिसपटू बनलाय. पहिल्या क्रमांकावर पोहोचणारा तो आतापर्यंतचा सर्वात तरुण खेळाडू आहे.