मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ चार टेस्ट मॅचच्या शेवटच्या सामन्याकरता आज सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर एकमेकांसमोर आहे. मॅचच्या पहिल्याच दिवशी कॅप्टन विराट कोहली आपल्या टीमसोबत दंडावर काळी पट्टी बांधून रमाकांत आचरेकर सरांना आदरांजली वाहिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर ऑस्ट्रेलिया खेळाडूंनी संघाची माजी फलंदाज बिल वॉट्सनच्या आठवणीत काळ्या रंगाचा बँड घातला आहे. 


भारतीय संघाला सचिन तेंडुलकरसारखा उत्तम खेळाडू देण्यात रमाकांत आचरेकर सरांचा मोठा वाटा आहे. लहानपणी मास्टर ब्लास्टर सचिनने आचरेकर सरांकडून क्रिकटचे प्रशिक्षण घेतले आहे. 


बुधवारी 2 जानेवारी रोजी मुंबईतल्या राहत्या घरी आचरेकर सरांचे निधन झाले. त्यांनी 87 व्या वर्षी अखेरचा निरोप घेतला. सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, प्रवीण आमरे, चंद्रकांत पंडीत, अजित आगरकर, बलविंदर सिंह संधू, संजय बांगर यांच्यासारखे अनेक खेळाडू आचरेकरांनी सरांनी घडवले. 



सचिन तेंडुलकरने आचरेकर सरांप्रती शोक व्यक्त केला. सचिन म्हणाला की, 'स्वर्गात त्यांच्या उपस्थितीत क्रिकेट आणखी समृद्ध होईल. अनेक विद्यार्थ्यांप्रमाणेच मी देखील आचरेकर सरांकडून क्रिकेटचे धडे घेतले.' 


'माझ्या जीवनातील त्यांच महत्व मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. गेल्याच महिन्यात मी इतर विद्यार्थ्यांसोबत त्यांची भेट घेतली. आम्ही एकत्र खूप वेळ घालवला'. 'आचरेकर सरांनी आम्हाला उत्तम खेळाबरोबरच चांगल्या आयुष्याचे देखील धडे दिले. आपल्या जीवनातील एक भाग बनवण्यासाठी आम्ही खूप आभारी आहोत सर... वेल प्लेड सर... तुम्ही जिथे असाल तिथे आणखी शिकवत राहा.'