मोईन अलीने निवृत्ती मागे का घेतली? ‘ते’ Whats App Chat समोर येताच खळबळ
Ashes 2023 : कसोटी क्रिकेटमध्ये अनेक खेळाडू त्यांची विशेष छाप सोडतात. त्यातलंच एक नाव म्हणजे मोईन अली. निवृत्तीनंतर हा खेळाडू पुन्हा कसोटी सामना खेळणार आहे...
Ashes 2023 : इथं WTC च्या अंतिम सामन्यात भारतीय क्रिकेट संघाचा दारुण पराभव झालेला असतानाच आता आणखी एका मानाच्या क्रिकेट सामन्याची सर्वांनाच प्रतीक्षा लागली आहे. ही स्पर्धा म्हणजे Ashes 2023. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये खेळवली जाणारी अॅशेल मालिका यंदाच्या वर्षी 16 जून रोजी सुरु होत आहे. त्याआधी अनेक क्रिकेटप्रेमींनी या मालिकेविषयीच्या काही पोस्ट आणि संघांतील खेळाडूंविषयी त्यांची उत्सुकता दाखवण्यास सुरुवात केली आहे.
अॅशेसच्या निमित्तानं एका खेळाडूच्या नावाचीही बरीच चर्चा होत आहे. हा खेळाडू म्हणजे, इंग्लंडच्या संघातील फिरकीपटू आणि अष्टपैलू खेळाडू मोईन अली. अॅशेस सुरु होण्याआधीच त्यानं कसोटी क्रिकेटमधील आपली निवृत्ती मागं घेतली आहे, ज्यामुळं सध्या त्याच्या नावाच्या चर्चा होताना दिसताहेत.
जॅक लीचला संघातून बाहेर व्हावं लागल्यामुळं इंग्लंड क्रिकेट बोर्ड आणि संघाचा कर्णधार बेन स्टोक्स यानं मोईन अलीशी संपर्क साधला आणि कसोटी संघात परतण्यासाठी त्याची मनधरणी केली. कसोटीमधील निवृत्तीचा निर्णय मागे घेते असल्याचं एका पत्रकार परिषदेत सांगताना मोईन अलीनंच यासंदर्भातील खुलासा केला आणि संपूर्ण क्रिकेट जगतात एकच खळबळही माजली.
बेन स्टोक्सनं एक मेसेज केला आणि...
स्टोक्ससोबतच्या त्या चॅटविषयी सांगताना मोईन म्हणाला, ''बेन स्टोक्सनं मला एक मेसेज केला ज्यामध्ये लिहिलं होतं 'अॅशेज?'. मला तोपर्यंत जॅक लीचबद्दल माहितच नव्हतं. त्यामुळं मी त्याच्या मेसेजवर LOL इतकाच रिप्लाय दिला. त्यानंतर लीचविषयी माहिती मिळताच मी त्याच्याशी संवाद साधला.'' पुढे त्या दोघांमध्ये संवाद झाला तो खेळाबद्दलच. कल्पना नसताना आलेला तो मेसेज मोईन अलीला पुन्हा संघात स्थान देऊन गेला असंच म्हणावं लागेल.
हेसुद्धा वाचा : लडाखमध्ये मराठमोळी 'खानावळ'; व्हेज, नॉनव्हेज थाळीवर ताव मारून समीर चौघुले तृप्त
मोईन अली In and Out
2014 मध्ये मोईन अलीनं कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आणि त्यानं 2021 मध्ये क्रिकेटच्या या प्रकारातून निवृत्ती घेतली. क्रिकेट कारकिर्दीत त्यानं 64 कसोटी सामन्यांमध्ये 28.29 च्या सरासरीनं 2914 धावा केल्या तर, 195 गडी बाद केले. साधारण दोन वर्षांच्या दुराव्यानंतर तो कसोटी क्रिकेटमध्ये परतत आहे. त्यामुळं आता त्याचा खेळ पाहणं ही क्रिकेटप्रमींसाठी परवणीच असेल.