Ashes Series : इंग्लंड विरूद्ध ऑस्ट्रेलिया ( England and Australia ) यांच्यामध्ये सध्या अॅशेज सिरीज ( Ashes Series ) सुरु आहे. या सिरीजमधील दुसरा सामना खेळवला जात असून दुसऱ्या दिवसाच्या अखेरीस इंग्लंडच्या टीमने 4 बाद 278 रन्स केले. दरम्यान दुसऱ्या दिवशी स्टिव्ह स्मिथने ( Steve Smith ) घेतलेल्या एका कॅचमुळे चांगलाच गदारोळ माजला. इंग्लंडचा फलंदाज जो रूटचा हा कॅच असून त्याला आऊट करार दिला. दरम्यान जो रूट हा आऊट होता की नॉट आऊट असा सवाल मात्र आता उपस्थित होताना दिसतोय. 


स्मिथने घेतलेला रूटचा कॅच ठरतोय वादग्रस्त 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंग्लंडचा स्टार फलंदाज जो रूटचा कॅच स्टिव्ह स्मिथने ( Steve Smith ) घेतला. इंग्लंडची फलंदाजी सुरु होत असताना 46 व्या ओव्हरमध्ये मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर स्मिथ बॅकवर्ड स्‍क्‍वायर लेगकडून धावत आला आणि हा कॅच घेतला. मात्र या कॅचनंतर मोठा गदारोळ माजलाय.    


जो रूटचा हा कॅच स्मिथने ( Steve Smith ) उडी मारून घेतला. मुळात ज्यावेळी स्मिथने हा कॅच पकडला त्यावेळी, तो त्याच्या हातून निसटलेला दिसला. मात्र तरीही त्याने तो कॅच घेतल्याने, तो एक कठीण कॅच मानला गेला. यावेळी मैदानी अंपायर्सने थर्ड अंपायर्सची मदत घेतली. दरम्यान थर्ड अंपायरने ऑस्ट्रेलियाच्या बाजूने निर्णय सुनावला आणि जो रूट अवघ्या 10 रन्सवर माघारी गेला. 


स्मिथवर पुन्हा लागतोय चिटींगचा आरोप


दरम्यान या कॅचमुळे पुन्हा एकदा नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. यावेळी चाहते स्टिव्ह स्मिथवर चिटींगचा आरोप लावतायत. याशिवाय स्टिव्ह स्मिथच्या ( Steve Smith ) कॅचची तुलना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये कॅमरून ग्रीनने घेतलेल्या कॅचसोबत केली जातेय. त्यामुळे हा कॅच पाहता जो रूट आऊट की नॉट आऊट असा सवाल उपस्थित होताना दिसतोय.  


स्टिव्ह स्मिथची तुफान फलंदाजी


अॅशेजमध्ये स्मिथने ( Steve Smith ) आपल्या नावे अजून एका रेकॉर्डची नोंद केलीये. सर्वात वेगवान 32 टेस्ट शतकं करणारा स्टीव्ह स्मिथ हा जगातील पहिला फलंदाज ठरलाय. अॅशेज सिरीजच्या ( Ashes Series ) दुसऱ्या टेस्टमध्ये स्टीव्ह स्मिथच्या ( Steve Smith ) 110 रन्स करत उत्तम खेळी केली. त्याच्या शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 416 रन्स केले. 


सिरीजमध्ये ऑस्ट्रेलिया 1-0 ने आघाडीवर


एजबॅस्टनमध्ये खेळल्या गेलेल्या अॅशेस सिरीजमधील ( Ashes Series ) पहिल्या टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा दोन विकेट्स राखून पराभव केला. त्यामुळे या पाच सामन्यांच्या सिरीजमध्ये ऑस्ट्रेलिया 1-0 अशी आघाडीवर आहे. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियन टीम लॉर्ड्स कसोटी जिंकून सिरीजमध्ये 2-0 अशी आघाडी घेण्याचा प्रयत्न करणार आहे.