दुबई : भारतीय संघाचा माजी फलंदाज आणि प्रशिक्षक संजय बांगर यांनी म्हटले आहे की, राष्ट्रीय संघात महेंद्रसिंह धोनीची जागा युवा ऋषभ पंत घेऊ शकतो. मधल्या फळीत संघाला चांगले संतुलन मिळु शकते. पंत आयपीएल-13 मध्ये उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. दिल्ली कॅपिटल या संघात या फलंदाजाने पाच सामन्यांत 171 धावा केल्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बांगर यांनी म्हटले आहे की, 'विकेटकीपिंगचा विचार करायचा झाल्यास पंत मला योग्य वाटतो. त्याने आयपीएलची सुरुवात चांगली केली आहे आणि मला वाटते की डाव्या हाताच्या फलंदाजाचा भारताकडे पर्याय असावा खासकरुन जेव्हा संघाची मधली फळी उजव्या हाताच्या फलंदाजांनी परिपूर्ण असेल. कारण यामुळे संतुलन साधण्यास मदत होईल.


माजी वेगवान गोलंदाज आशिष नेहरालाही बांगरच्या या मतावर सहमती दर्शवली आहे. नेहरा म्हणाला की, 'मी बांगर यांच्याशी पूर्णपणे सहमत आहे. मला वाटते टीमने पंतबरोबर जावे. पंतला सपोर्ट करायला हवे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा विचार केला तर प्रत्येक खेळाडूला सपोर्टची गरज असते.'


धोनीने यावर्षी 15 ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. धोनीने क्रिकेट या खेळाला एक नवा आदर्श घालून दिला आहे. त्याची जागा घेणं कोणालाही लवकर शक्य नाही. धोनीच्या नेतृत्वात संघाने मोठी कामगिरी केली आहे.