नवी दिल्ली : भारताचा फास्ट बॉलर आशिष नेहरा दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानात होणाऱ्या मॅचनंतर निवृत्त होणार आहे. १ नोव्हेंबरला न्यूझीलंडविरुद्ध ही मॅच होणार आहे. या मॅचआधी नेहरानं भारताचे माजी प्रशिक्षक ग्रेग चॅपलवर निशाणा साधला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जॉन राईट कोच असताना चांगली कामगिरी केलेल्या आशिष नेहरानं ग्रेग चॅपल कोच असताना फारशी चांगली कामगिरी केली नाही. त्यानंतर गॅरी कर्स्टन प्रशिक्षक झाल्यावर नेहरानं पुन्हा एकदा कमबॅक केलं. गॅरी कर्स्टन प्रशिक्षक असताना भारतानं जिंकलेल्या २०११ सालच्या टीमचा नेहरा सभासद होता.


२००५ साली खेळलेल्या दोन सीरिजनंतर ग्रेग चॅपलबरोबर मी जास्त खेळलो नाही. ग्रेग चॅपल बिर्याणी खिचडी होणार हे मला पहिल्या सीरिजपासून माहिती होतं, असं नेहरा म्हणालाय. गॅरी कर्स्टन मात्र सर्वोत्तम प्रशिक्षक होता. ग्रेग चॅपलनं जुनियर खेळाडूंना चांगलं प्रशिक्षण केलं, असतं, अशी प्रतिक्रिया नेहरानं दिली आहे.


विराट कोहलीसाठी रवी शास्त्री आदर्श कोच आहेत, असं मत नेहरानं व्यक्त केलं आहे. या स्थानावर असताना विराटला ज्ञानाची नाही तर मदतीची गरज आहे. रवी शास्त्री तेच करत असल्याचं नेहरा म्हणाला आहे.


निवृत्त झाल्यावर प्रशिक्षक आणि कॉमेंट्री करण्याची इच्छा असल्याचं नेहरानं बोलून दाखवलं आहे. २०१९च्या विश्वचषकापर्यंत प्रशिक्षक होण्याचा उद्देश नसल्याचं नेहरानं स्पष्ट केलं आहे.