इंदूर : भारताविरुद्धची वनडे सीरिज गमावलेल्या ऑस्ट्रेलियाला आणखी एक धक्का बसला आहे. तिसऱ्या वनडे मॅचवेळी फिल्डिंग करताना दुखापत झालेला अॅश्टन अगर वनडे सीरिजमधून बाहेर झाला आहे. बोटाला झालेल्या दुखापतीमुळे अगर पुढच्या दोन वनडे खेळू शकणार नाही, असं ऑस्ट्रेलियाचे चिकित्सक रिचर्ड सॉ यांनी सांगितलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रविवारी इंदूरमध्ये झालेल्या मॅचवेळी फिल्डिंग करताना अगरच्या बोटाला दुखापत झाली. एक्सरे काढल्यावर त्याच्या बोटाला फ्रॅक्चर झाल्याचं स्पष्ट झालं आहे. फ्रॅक्चर झाल्यामुळे अगर आता ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे. ऑस्ट्रेलियामध्ये त्याच्या बोटावर शस्त्रक्रिया होण्याचीही शक्यता आहे.