लंडन : चॅम्पियन्स ट्रॉफीमधल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मॅचमध्ये भारतीय संघामध्ये एक बदल करण्यात आला आहे. या मॅचमध्ये उमेश यादवऐवजी आर. अश्विनला संधी देण्यात आली आहे. या मॅचमध्ये टॉस जिंकून भारतानं पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आहे. स्पर्धेची सेमीफायनल गाठण्यासाठी भारताला हा सामना जिंकणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या सामन्यात विजय मिळवल्यास ग्रुप बीमधून सेमीफायनलमध्ये पोहोचणारा भारत पहिला संघ ठरेल.


भारतीय संघ - रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली, युवराज सिंग, एम एस धोनी, हार्दिक पंड्या, केदार जाधव, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, आर. अश्विन, जसप्रीत बुमराह