दुबई : प्रतिस्पर्धी खेळाडूंचे फोटो फोटोशॉप केल्यामुळे बांगलादेश क्रिकेटच्या समर्थकांवर आत्तापर्यंत बरेच वेळा टीका झाली आहे. पण आशिया कपमध्ये बांगलादेशच्या समर्थकांचं वेगळचं चित्र पाहायला मिळालं. आशिया कपच्या पहिल्या मॅचमध्ये बांगलादेशनं श्रीलंकेला 137 रननं हरवलं. यानंतर बांगलादेश समर्थकांनी स्टेडियममध्ये जे केलं त्यामुळे त्यांचं कौतुक होत आहे. श्रीलंकेविरुद्धच्या विजयानंतर प्रेक्षक निघून गेले पण बांगलादेशी समर्थकांच्या ग्रुपनं स्टेडियममध्ये पडलेला कचरा उचलला. रात्रीपर्यंत बांगलादेशी समर्थक स्टेडियममधल्या प्लास्टिक पिशव्या आणि कचरा गोळा करत होते. हा कचरा डस्टबिनमध्ये टाकून बांगलादेशी समर्थक निघून गेले.



ऑलिम्पिक-वर्ल्ड कपमध्ये जपाननंही असं केलं


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रियो ऑलिम्पिक 2016 आणि यावर्षी जुन-जुलैमध्ये झालेल्या फिफा वर्ल्ड कपवेळी जपानच्या समर्थकांनीही अशाच प्रकारे स्टेडियममधील कचरा उचलला होता.


क्रिकेटच्या मैदानात पहिल्यांदाच स्वच्छता अभियान


क्रिकेटच्या मैदानात मात्र पहिल्यांदाच अशाप्रकारे स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. बांगलादेशमधल्या वृत्तपत्रांनी याचे फोटो पहिल्या पानावर छापले आहेत.


जपानच्या समर्थकांचं पराभवानंतरही स्वच्छता अभियान


फिफा वर्ल्ड कपच्या नॉक आऊट मॅचमध्ये बेल्जियमनं जपानला 3-2नं हरवलं. या पराभवामुळे जपान स्पर्धेतून बाहेर झालं होतं. तरी निराश झालेल्या समर्थकांनी स्टेडियममध्ये स्वच्छता केली. हे फोटो तेव्हा सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाले होते.


मुर्तझाचे प्रेक्षकांना धन्यवाद


बांगलादेशच्या समर्थकांनी केलेल्या स्वच्छतेबद्दल बांगलादेश क्रिकेट टीमचा कर्णधार मशरफे मुर्तझानं धन्यवाद दिले.