IND VS AFG : भुवनेश्वर कुमारची धडाकेबाज कामगिरी; पॉवरप्लेमध्ये पाच विकेट घेत दिल्या फक्त इतक्या धावा
पॉवरप्लेमध्येच अफगाणिस्तानच्या संघाने 5 विकेट गमावल्या
IND VS AFG : आशिया चषक 2022 (Asia Cup 2022) च्या सुपर-4 मधील पाचवा सामना, टीम इंडिया आणि अफगाणिस्तान (IND VS AFG) यांच्यात दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर (Dubai International Cricket Stadium) खेळला जात आहे. विराट कोहलीच्या (virat kohli) 71व्या आंतरराष्ट्रीय शतकाच्या बळावर भारताने आशिया कप 2022 च्या शेवटच्या सामन्यात अफगाणिस्तानसमोर (afghanistan) 213 धावांचे लक्ष्य ठेवलं आहे. प्रत्युत्तरात अफगाणिस्तानची फलंदाजी पत्त्यासारखी कोसळली आहे.
पॉवरप्लेमध्येच अफगाणिस्तानच्या संघाने 5 विकेट गमावल्या आहेत. भारताकडून भुवनेश्वर कुमारने (bhuvneshwar kumar) केवळ चार रन देत पाच विकेट घेतल्या आहेत. अफगाणिस्तानचा सलामीवीर पहिल्याच षटकात पॅव्हेलियनमध्ये परतला. हजरतुल्ला जझाई (0) आणि रहमानउल्ला गुरबाज हेही खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतले. दोन धावांवर भुवनेश्वरने करीम जनातला बाद केले.
यानंतर नजीबुल्ला झदरनलाही खाते उघडता आले नाही. अर्शदीप सिंगने कर्णधार मोहम्मद नबीला बाद करून अफगाणिस्तानला पाचवा धक्का दिला. भुवनेश्वरने आपल्या तिसऱ्या षटकात अजमतुल्ला ओमरझाईला बाद करून अफगाणिस्तानची सहावी विकेट घेतली.
दरम्यान, अफगाणिस्तानविरुद्ध भारताने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. गेल्या दोन सामन्यांमध्ये भारताला पराभवाचा सामना करावा लागला असला तरी या सामन्यात दमदार कामगिरी करून चाहत्यांची मने जिंकली. संघाची आजची कामगिरी चाहत्यांच्या जखमांवर फुंकर मारणारी ठरली आहे. या सामन्यात विराट कोहलीचा फॉर्म परतला असून भुवनेश्वरने धडाकेाज कामगिरी केली आहे.