आशिया कप स्पर्धा  2022 (Asia Cup 2022) सुरू होण्यापूर्वी पाकिस्तानला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. पाकिस्तानचा स्टार वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी (Shaheen Afridi) दुखापतीमुळे स्पर्धतून बाहेर पडला. त्यानंतरही मोठ्या तयारीसह पाकिस्तानी संघ स्पर्धेत उतरला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र पुन्हा एकदा पाकिस्तानी संघाला धक्का बसला आहे. संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद वसीम ज्युनियर (mohammad wasim jr) डाव्या बाजूच्या दुखापतीमुळे आशिया चषक स्पर्धेतून बाहेर पडला आहे. बुधवारी पाकिस्तानच्या सराव सत्रात गोलंदाजी करताना त्याला दुखापत झाली.


28 ऑगस्ट रोजी भारताविरुद्धच्या मोहिमेला सुरुवात होण्यापूर्वी संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद वसीम ज्युनियरला झालेली दुखापत ही पाकिस्तानसाठी चांगली बातमी नाही.यापूर्चवी संघाचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीही दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला आहे.


मोहम्मद वसीम ज्युनियरच्या जागी हसन अलीचा संघात समावेश करण्यात आला आहे. मात्र याला इव्हेंट टेक्निकल कमिटीची मंजुरी अद्याप प्रलंबित आहे.


वेगवान गोलंदाज वसीमने गेल्या वर्षी जुलैमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध पदार्पण केले होते. तेव्हापासून तो 11 टी20 सामने खेळला आहे, ज्यामध्ये त्याने 15.88 च्या सरासरीने आणि 8.10 च्या इकॉनॉमीने 17 बळी घेतले आहेत. मार्चमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या घरच्या मालिकेतही वसीमने चमकदार कामगिरी केली होती. त्याने तीन एकदिवसीय सामन्यांमध्ये 5 विकेट घेतल्या.


आशिया कपमधून बाहेर होणारा पाकिस्तानचा हा दुसरा वेगवान गोलंदाज आहे. याआधी संघाचा स्टार वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी गुडघ्याच्या दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला होता. आफ्रिदीच्या जागी मोहम्मद हसनैनला संघात स्थान मिळाले आहे.