Asia Cup 2022 : आशिया कपआधी टीम इंडियासाठी आनंदाची बातमी
एशिया कपच्या (Asia Cup 2022) सुरुवातीआधी टीम इंडियासाठी (Team India) चांगली बातमी समोर आली आहे.
Asia Cup 2022 : एशिया कपच्या (Asia Cup 2022) सुरुवातीआधी टीम इंडियासाठी (Team India) चांगली बातमी समोर आली आहे. या बातमीमुळे टीम इंडियाचा आशिय कप जिंकण्याचा मार्ग आणखी मोकळा आणि सोप्पा झाला आहे. टीम इंडियासाठी शत्रू असलेला खेळाडू स्पर्धेतून बाहेर पडला आहे. आशिया कपला 27 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यातील महामुकाबला 28 ऑगस्टला खेळवण्यात येणार आहे. (asia cup 2022 pakistan faster bolwer shaheen shah afridi ruled out due to injurey)
मोठा खेळाडू स्पर्धेतून बाहेर
पाकिस्तानचा घातक वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रीदी (shaheen shah afridi) स्पर्धेतून बाहेर झालाय. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. शाहीनने गेल्या वर्षी वर्ल्ड कप 2021 मध्ये टीम इंडिया विरुद्धच्या सामन्यात रोहित शर्मा, केएल राहुल आणि विराट कोहली या तिघांना आऊट केलं होतं. शाहीनने यासह पाकिस्तानच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली होती.
नक्की कारण काय?
शाहीनला गेल्या महिन्यात श्रीलंका विरुद्धच्या पहिल्या कसोटीत गुडघ्याला दुखापत झाली. शाहीन अजूनही या दुखापतीतून सावरलेला नाही. पीसीबीनुसार, शाहीनला 6 आठवडे विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळे आता शाहीन ऑक्टोबरला होणाऱ्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये खेळणार की नाही, अशीही शंका उपस्थित केली जात आहे.
एशिया कप 2022 साठी टीम पाकिस्तान
बाबर आझम, मोहम्मद रिझवान, आसिफ अली, शादाब खान, हैदर अली, फखर जमा, इफ्तिखार अहमद, हॅरिस रऊफ, मोहम्मद नवाज, खुशदिल शाह, मोहम्मद वसीम जूनियर, मोहम्मद रिजवान, नसीम शाह, शाहनवाज दहानी आणि उस्मान कादिर.