Asia Cup 2022 Pakistan Loss In Final: आशिया कप 2022 स्पर्धेतील अंतिम सामन्यात श्रीलंकेनं पाकिस्तानचा धुव्वा उडवला. या सामन्यात श्रीलंकेनं पाकिस्तानवर 23 धावांनी विजय मिळवला. त्यामुळे पाकिस्तानचा संघ तिसऱ्यांदा आशिया कपवर नाव कोरता कोरता राहिला. भानुका राजपक्षे या विजयाचा शिल्पकार ठरला. भानुकाने 45 चेंडूत नाबाद 71 धावा केल्या. या खेळीत 6 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश आहे. मात्र भानुकाला जीवदान मिळाल्यानेच पाकिस्तानचा पराभव झाल्याचं पाकिस्तानी नेटकरी सांगत आहे. या प्रकरणी नेटकरी शादाब खानवर टीकेची झोड उठवत आहे. आता शादाब खाननं आपली चूक कबुल केली असून पराभवाची जबाबदारी स्वीकारली आहे. या प्रकरणी त्याने सोशल मीडियावर माफी देखील मागितली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"Catches Win Matches..मला माफ करा, मी या पराभवाची जबाबदारी स्वीकारतो. माझ्यामुळे संघावर अशी वेळ आली. नसीम शाह, हरिस रौफ, नवाज यांचा बॉलिंग अटॅक चांगला होता. मोहम्मद रिझवानची कामगिरी चांगली होती. संपूर्ण टीम चांगली खेळली. विजयासाठी श्रीलंकन संघाला शुभेच्छा", असं ट्वीट शादाब खान यानं केलं आहे.



श्रीलंके विरुद्धच्या सामन्य्ता शादाब खानने दोन झेल सोडले. एका टप्प्यावर श्रीलंकेची 58/5 अशी स्थिती होती. मात्र ऐन मोक्याच्या क्षणी झेल सोडल्याने जीवदान मिळालं आणि श्रीलंकन खेळाडूंनी फायदा घेतला. भानुका राजपक्षेच्या नाबाद 71 धावांच्या खेळीमुळे संघाला 170 धावा करता आल्या. 171 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तान निर्धारित 20 षटकात सर्वाबाद 147 धावा करू शकला.