Sport News :  आशिया कपच्या सुपर 4 संघांमध्ये मध्ये काटे की टक्कर पाहायला मिळणार आहे. शुक्रवारी झालेल्या सामन्यात पाकिस्तानने हाँगकाँगवर (PAK vs HKG) 155 धावांनी दणदणीत विजय मिळवला. पाकिस्तानने या विजयासह सुपर 4  (Super 4) मध्ये स्थान मिळवलं आहे. त्यानंतर उर्वरित संघांमध्ये अशा लढती रंगणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चार संघांमध्ये अशा रंगणार लढती
श्रीलंका वि. अफगाणिस्तान 3 सप्टेंबर, शारजाह
भारत वि. पाकिस्तान 4 सप्टेंबर, दुबई
भारत वि. श्रीलंका 6 सप्टेंबर, दूबई
अफगाणिस्तान वि. पाकिस्तान 7 सप्टेंबर, शारजाह
भारत वि. अफगाणिस्तान 8 सप्टेंबर, दुबई
श्रीलंका वि. पाकिस्तान 9 सप्टेंबर, दुबई
फायनल सामना 11 सप्टेंबरला दुबईमध्येच रंगणार


 



भारताने पाकिस्तान आणि हॉंगकॉंग संघाचा पराभव केला आहे. पाकिस्तानला एकदा पराभवाचा सामना करावा लागला होता. उद्याचा रविवारही सुपर सनडे असणार आहे. पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या भारत-पाक सामना पाहण्यासाठी क्रीडाप्रेमींनाही उत्सुकता लागलेली असते. 


आशिया चषक 1984 मध्ये सुरू झाला आहे.  टीम इंडिया आशिया चषक स्पर्धेमधील सर्वात यशस्वी संघ आहे. भारताने आतापर्यंत 7 वेळा या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. श्रीलंकेने 5 आणि पाकिस्तानने दोनदा विजेतेपद पटकावलं आहे. यंदा कोण बाजी मारतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे