Asia Cup : आशियाई क्रिकेटचा हा महाकुंभ 27 ऑगस्टपासून सुरू होणार असून भारत-पाकमधील हाय व्होलटेज सामन्याची सर्व क्रीडाप्रेमी उत्सुकतेने वाट पाहत आहेत. त्याचबरोबर क्रिकेट चाहत्यांच्या नजरा स्टार खेळाडू विराट कोहलीवर खिळल्या आहेत. विराट फॉर्ममध्ये दिसलेला नाही. अशातच कोहलीचा प्रॅक्टिस करतानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रदीर्घ विश्रांतीनंतर पुनरागमन करणाऱ्या विराटकडून टीम इंडियाला आशिया कप स्पर्धेमध्ये खूप आशा आहेत. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी विराट नेट सराव करताना दिसत आहे. विराटने युझवेंद्र चहल आणि रवींद्र जडेजासारख्या फिरकीपटूंच्या चेंडूंवर मोठे फटके मारताना दिसत आहे.


भारताने इतक्या वेळा जिंकलाय आशिया कप विराट कोहली जर त्याच्या जुन्या फॉर्ममध्ये आला तर तो एकटाच खेळाडू प्रतिस्पर्धी संघावर भारी ठरू शकतो. आशिया चषक स्पर्धेमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढतीकडे जगातील क्रीडाप्रेमींचं लक्ष लागलं आहे. असले तरी. मात्र या स्पर्धेच्या इतिहासात टीम इंडियाचे पारडे जगभरातील संघांवर नेहमीच जड राहिलं आहे.


टीम इंडियाने 7 वेळा आशिया कप जिंकला आहे. त्यानंतर श्रीलंकेच्या संघाने 5 वेळा ट्रॉफी 5 वेळा जिंकली आहे. पाकिस्तानला दोनदा जिंकण्यात यश आलं आहे. बांगलादेश आणि अफगाणिस्तानने आजपर्यंत एकदाही आशिया कप ट्रॉफी जिंकलेली नाही.


 



आशिया कपसाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (डब्ल्यूके), दिनेश कार्तिक (डब्ल्यूके), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, आर अश्विन, युझवेंद्र चहल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, आवेश खान


राखीव खेळाडू: श्रेयस अय्यर, अक्षर पटेल आणि दीपक चहर