Team India For Asia Cup 2023: येत्या 30 ऑगस्टपासून आशिया कपला सुरुवात होणार आहे. यावेळी सोमवारी आशिया कपसाठी टीम इंडियाची सिलेक्शन होणार आहे. दुपारी दीड वाजता टीम इंडियाची घोषणा केली जाणार आहे. यामध्ये एकूण 17 सदस्यीय टीमची घोषणा करण्यात येण्याची शक्यता आहे. बीसीसीआयने टीम सिलेक्शनसाठी 21 ऑगस्टची मिटींग ठेवण्यात आली आहे. यानंतर दुपारी दीड वाजता मुख्य सिलेक्टर अजित आगरकर प्रेस कॉन्फ्रेंस घेऊन टीमची घोषणा करतील. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान याचवेळी एक मोठी बातमी समोर आली आहे. बीसीसीआय यावेळी टीम सिलेक्शनच्या वेळी आपला एक मोठा नियम मोडणार असल्याचं म्हटलं जातंय. जाणून घेऊया या नियम नेमका कोणता आहे. 


टीम सिलेक्शनवेळी BCCI मोडणार हा नियम


मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी दिल्लीत होणाऱ्या बैठकीला मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड देखील उपस्थित राहणार आहेत. रवी शास्त्री आणि अनिल कुंबळे यांसारखे यापूर्वीचे दिग्गज देखील मुख्य प्रशिक्षक असताना निवड बैठकांना उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे यावेळी बीसीसीसआय प्रथमच निवड बैठकीच्या परंपरेमध्ये बदल करणाना दिसणार आहे.


मुळात ऑस्ट्रेलियामध्ये, मुख्य प्रशिक्षक हा NSP (नॅशनल सिलेक्शन पॅनेल) चा एक भाग असतो. मात्र भारतामध्ये राष्ट्रीय संघाच्या प्रशिक्षक आणि कर्णधाराला निवडीच्या बाबतीत मत देण्याचा अधिकार नाही. कर्णधार रोहित शर्मा आणि द्रविड दोघेही या बैठकीला प्रत्यक्ष उपस्थित राहणार की व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हे अजून समजलेलं नाही. 


17 खेळाडूंची करणार घोषणा


आशियाई क्रिकेट परिषदेने (ACC) आशिया कप स्पर्धेसाठी 17 सदस्यीय टीमची तरतूद केलीये. त्यानुसार पाकिस्तान, बांगलादेशने 17 सदस्यीय टीम निवडलीये. आता टीम इंडिया देखील वर्ल्ड कप डोळ्यासमोर ठेवून 17 सदस्यीय टीमची निवड करणार आहे. 


बीसीसीआयच्या एका सूत्राने पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, 'वर्ल्डकप स्पर्धेसाठी 15 सदस्यीय तात्पुरती टीम निवडण्याची शक्यता आहे. दरम्यान ही टीम 5 सप्टेंबरपर्यंत सादर करावी लागणार आहे. कोणतीही टीम या यादीत बदल करू शकणार आहे. टीमची अंतिम यादी देण्याची अंतिम मुदत 27 सप्टेंबर असणार आहे.  


कशी असेल टीम इंडियाची संभाव्य टीम


रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, इशान किशन (विकेटकीपर), अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, युझवेंद्र चहल किंवा रविचंद्रन अश्विन.