India vs Pakistan Asia Cup 2023: एशिया कप ( Asia Cup 2023 ) सुरु होण्यासाठी आता अवघे 10 दिवस उरले आहेत. 30 ऑगस्टपासून एशिया कपला सुरुवात होणार आहे. यावेळी सर्व चाहत्यांना उत्सुकता आहे ती, भारत पाकिस्तान या हायव्होल्टेज सामन्याची. मात्र या सामन्याबाबत चाहत्यांसाठी एक मोठी आणि वाईट बातमी आहे. या बातमीमुळे चाहत्यांचा हिरमोड होण्याची शक्यता आहे. 


भारत-पाकिस्तान सामन्यावर मोठं संकट


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

येत्या काळात आता आशिया कप ( Asia Cup 2023 ) आणि वनडे वर्ल्डकप 2023 मध्ये भारत-पाकिस्तान एकमेकांशी भिडणार आहेत. एशिया कपच्या वेळापत्रकानुसार भारत आणि पाकिस्तान 2 सप्टेंबर रोजी सामना होणार आहे. साखळी फेरीत हा सामना रंगणार असून श्रीलंकेतील कॅंडी शहरात हा खेळवला जाणार आहे. मात्र या सामन्यावर पावसाचं सावट असल्याची चर्चा होतेय. 


Accuweather च्या अहवालानुसार, भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशी पावसाची 40 टक्के शक्यता आहे. सामन्याच्या एक दिवस आधीही पावसाची 51 टक्के पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. त्यामुळे ही बातमी नक्की चाहत्यांचा हिरमोड करणारी ठरू शकते. 


हायब्रिड मॉडलवर खेळवला जाणार एशिया कप


यंदाचा एशिया कप ( Asia Cup 2023 ) हायब्रिड मॉडलवर खेळवला जाणार असून पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यामध्ये याचे सामने रंगणार आहेत. यावेळी एशिया कप वनडे फॉर्मेटमध्ये खेळवला जाणार आहे. यामध्ये लीग टप्पा, सुपर-4 आणि फायनल असे एकूण 13 सामने खेळवले जाणार आहे. आशिया कप 2023 मध्ये भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि नेपाळ या टीम एकमेकांविरूद्ध लढणार आहेत.


यावेळी  भारत, पाकिस्तान आणि नेपाळ या टीम्सना एका ग्रुपमध्ये ठेवण्यात आलंय. तर गेल्या वर्षी विजयी ठरलेल्या श्रीलंका, अफगाणिस्तान आणि बांगलादेश दुसऱ्या गटात आहेत.


कशी आहे एशिया कपसाठी पाकिस्तानची टीम?


बाबर आझम (कर्णधार), शादाब खान (उपकर्णधार), अब्दुल्ला शफीक, फखर जमान, इमाम-उल-हक, सलमान अली आगा, इफ्तिखार अहमद, तैयब ताहिर, सौद शकील, मोहम्मद रिझवान, मोहम्मद हरीस, मोहम्मद नवाज, उस्मा मीर , नसीम शाह, फहीम अश्रफ, हारिस रौफ, मोहम्मद वसीम जूनियर आणि शाहीन शाह आफ्रिदी.


एशिया कपचं शेड्यूल


  • पाकिस्तान विरुद्ध नेपाळ - 30 ऑगस्ट

  • बांगलादेश विरुद्ध श्रीलंका - 31 ऑगस्ट

  • भारत विरुद्ध पाकिस्तान - 2 सप्टेंबर

  • बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान - 3 सप्टेंबर

  • भारत विरुद्ध नेपाळ - 4 सप्टेंबर

  • श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान - 5 सप्टेंबर