Pakistan VS Nepal, Asia Cup 2023 1st Cricket Match Score: एश‍िया कप 2023 ला आजपासून सुरुवात झाली. यावेळी पहिला सामना पाकिस्तान विरूद्ध नेपाळ यांच्यामध्ये खेळवण्यात आला. या सामन्यात पाकिस्तानने नेपाळचा पराभव केलाय. पाकिस्तानने नेपाळचा 238 रन्सने पराभव केलाय. 104 रन्सवर नेपाळची संपूर्ण टीम ऑलआऊट झाली.


पाकिस्तानकडून नेपाळचा दारूण पराभव


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सामन्यात पाकिस्तानच्या टीमने प्रथम फलंदाजी करत 342 रन्सचा डोंगर नेपाळसमोर उभा केला होता. या सामन्यात नेपाळ टीमला 343 रन्सचं लक्ष्य मिळालं होतंय. यावेळी नेपाळला प्रत्युत्तरात केवळ 104 रन्स करता आले. नेपाळकडून सोमपाल कामीने 28, आरिफ शेखने 26 आणि गुलशन झाने 13 रन्स केले. याशिवाय एकाही खेळाडूला दुहेरी आकडा गाठता आला नाही.


पाकिस्तानने घरच्या मैदानावर मिळवला रेकॉर्ड विजय


हा विजय नोंदवत पाकिस्तानने नवा इतिहास रचला आहे. घरच्या मैदानावर रन्सच्या बाबतीत पाकिस्तानचा वनडे फॉरमॅटमधील हा सर्वात मोठा विजय आहे. यापूर्वी पाकिस्तानच्या टीमने तब्बल 18 वर्षांपूर्वी कराची वनडेत इंग्लंडचा 165 रन्सच्या फरकाने पराभव केला होता. त्यानंतर आता बाबरच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान टीमने हा विक्रम मोडीत काढला आहे. 


एकूण वनडे फॉरमॅटमध्ये पाकिस्तानचा हा तिसरा सर्वात मोठा विजय मानला जातोय. पाकिस्तानच्या टीमने 18 ऑगस्ट 2016 रोजी आयर्लंड विरुद्ध डब्लिन वनडे सामन्यात सर्वात मोठा विजय नोंदवला. त्यानंतर पाकिस्तानने आयर्लंडचा त्यांच्याच घरात 255 रन्सच्या फरकाने पराभव केला होता.


बाबर आणि इफ्तिखार यांची तुफान खेळी 


या सामन्यात पाकिस्तान टीमने टॉस जिंकला होता. टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि 6 गडी गमावून 342 रन्स केले. या सामन्यात बाबर आझमने पुन्हा एकदा आपली धडाकेबाज शैली दाखवत तुफानी शतक झळकावलं. बाबरने 131 बॉल्समध्ये 151 रन्सची शानदार खेळी केली. तर दुसरीकडे इफ्तिखारनेही त्याला साथ देत शकत झळकावणार आहे.