Asia Cup 2023: एशिया कपमध्ये ( Asia Cup 2023 ) 2 सप्टेंबर रोजी भारत पाकिस्तान सामना रंगला होता. या पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना रद्द करण्यात आला. भारत-पाकिस्तान हा हायव्होल्टेज सामना रद्द झाल्याने चाहत्यांचा मात्र हिरमोड झाल्याचं दिसून आलं. मात्र अशातच चाहत्यांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर आलीये. एशिया कपच्या स्पर्धेत पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान आमने-सामने येणार आहेत.  


'या' दिवशी पुन्हा भिडणार भारत पाकिस्तान


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडियाने सोमवारी आशिया कपमध्ये नेपाळचा पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने सुपर-4 मध्ये आपलं स्थान निश्चित केलं आहे. आता सुपर-4 टप्प्यातील भारताचा पहिला सामना रविवारी 10 सप्टेंबर रोजी पाकिस्तानशी होणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चाहत्यांना भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज सामन्याचा थरार अनुभवता येणार आहे. 


2 सप्टेंबर रोजी पल्लेकलमध्ये झालेल्या सामन्यात पावसाने व्यत्यय आणला. या सामन्यात टीम इंडियाने प्रथम टॉस जिंकून फलंदाजी केली होती. मात्र पाकिस्तानच्या फलंदाजीपूर्वी पावसाने पुन्हा एकदा खेळ करत सामना रद्द केला. 


एशिया कपमध्ये भारताने स्पर्धेच्या दुसऱ्या सामन्यात नेपाळचा पराभव केला. त्यामुळे 10 सप्टेंबरला भारत आणि पाकिस्तान यांच्यात शानदार सामना होणार हे निश्चित झालं. 


नेपाळने आसिफ शेखचं अर्धशतक आणि सोमपाल कामीच्या आकर्षक खेळीच्या बळावर नेपाळने सोमवारी भारताविरुद्ध 48.2 ओव्हरमध्ये 230 रन्सचा स्कोर केला. नेपाळने दिलेल्या 231 रन्सचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि शुभमन गिल ओपनिंग आले. यावेळी रोहित आणि शुभमनने टीम इंडियाची एकंही विकेट न गमावता आव्हान पूर्ण केलं. रोहितने 74 धावा केल्या तर शुभमन गिलने 67 धावांची खेळी केली.


पुढचे सामने होणार कोलंबोमध्ये


एशिया कप हा हायब्रिड मॉडलवर खेळवण्यात येतोय. यावेळी श्रीलंका आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये सामने खेळवले जात असून सुपर-4 आणि अंतिम सामन्याचा मान श्रीलंकेला देण्यात आला आहे. कोलंबात 9, 10, 12, 14 आणि 15 सप्टेंबरला आर प्रेमदासा स्टेडिअममध्ये सामने खेळवले जाणार आहेत. पण कोलंबोत सध्या मुसळधार पाऊस पडतोय. दुसरीकडे कँडीतही पावसाने हजेरी लावली आहे. 2 सप्टेंबरला भारत आणि पाकिस्तान कँडीतल्या पल्लेकल स्टेडिअममध्ये खेळवण्यात आला होता. पण पावसामुळे हा सामना रद्द करण्यात आला.