Asia Cup 2023: नेपाळच्या क्रिकेटर्सचा पगार भारतातल्या शिपायांपेक्षा कमी, आकडा ऐकून बसेल धक्का
Asia Cup 2023: सर्वात श्रीमंत क्रिकेटबोर्ड म्हणून भारतीय क्रिकेट बोर्डाची गणना होते. भारतीय खेळाडूंनाही लाखोत पगार मिळतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेट असो की आयपीएल भारतीय क्रिकेटर्स अगदी तरुण वयातच मालामाल होतात. पण नेपाळ क्रिकेट संघातील खेळाडूंना इतका कमी पगार मिळतो की तुम्ही विश्वासही ठेवणार नाही.
Asia Cup 2023 : क्रिकेट संघाने मैदानात उतरताच इतिहास रचला आहे. एशिया कप स्पर्धेत पहिल्यांदाच नेपाळ संघ (Nepal Cricket Team) खेळतोय. एशिया कप स्पर्धेत या संघाची कामगिरी किती चांगली होते, यापेक्षाही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रवेश झाला हे महत्त्वूपर्ण आहे. पण तुम्हाला माहित आहे का? ज्या खेळाडूंच्या जोरावर नेपाळने एशिया कप स्पर्धेत एन्ट्री केलीय, त्या खेळाडूंची कमाई किती आहे? क्रिकेट खेळात प्रचंड पैसा आहे, भारतीय क्रिकेटपटू लाखोनी पैसे कमावतात. पण याच्या दहा टक्केही नेपाळच्या क्रिकेटपटूंना मिळत नाहीत. विशेष म्हणजे भारतातल्या शिपायापेक्षाही नेपाळ क्रिकेटर्सचा पगार (Salary) कमी आहे.
हे ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. पण हे खरं आहे. नेपाळ क्रिकेटर्स जितकी कठोर मेहनत करतायत, त्या तुलनेत त्यांना मिळणारं मानधन फारच कमी आहे. भारतीय क्रिकेट बोर्ड (BCCI) किंवा इतर क्रिकेट बोर्ड ज्याप्रमाणे आपल्या खेळाडूंशी करार करतात. त्याचप्रमाणे नेपाळ क्रिकेट बोर्डचाही आपल्या खेळाडूंबरोबर करार होतो. खेळाडूंची तीन ग्रेडमध्ये विभागणी करण्यात आली असून ग्रेडनुसार त्यांना पगार दिला जातो.
नेपाळ क्रिकेटर्सना किती मिळतो पगार?
आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या क्रिकेटपटूंसाठी तीन ग्रेड आहेत. यातल्या ग्रेड ए मध्ये असलेल्या क्रिकेटर्सना महिन्याला 60 हजार रुपये इतकं मानधन मिळतं. बी ग्रेड मधल्या खेळाडूंना 50 हजार रुपये आणि सी ग्रेडमधल्या खेळाडूंना 40 हजार रुपये प्रती महिना मानधन दिलं जातं. आता तुम्ही म्हणाल हा पगार भारतातल्या शिपायाला मिळणाऱ्या पगारापेक्षा कमी कसा? नेपाळच्या करन्सीची तुलना भारतीय पैशात केली तर याचं उत्तर मिळू शकेल.
शिपायापेक्षाही कमी पगार
नेपाळ क्रिकेट संघातील ए ग्रेडमधल्या खेळाडूंना 60 हजार रुपये मिळता. पण भारतात याचं मुल्य 37,719 इतकं होतं. 50 हजार नेपाळी करन्सीचं मूल्य 31,412 इतकं आहे. तर ज्या नेपाळी क्रिकेटर्सना 40 हजार रुपये मिळतात. भारतीय चलनात त्याचं मूल्य 25 हजार रुपये इतकं आहे. भारतात सरकारी नोकरीत काम करणाऱ्या शिपायाला यापेक्षा नक्कीच जास्त पगार असतो. भारतात सरकारी संस्थेत काम करणाऱ्या शिपायाचं वार्षिक उत्पन्न कमीतकमी पाच लाख इतकं आहे.
एकदिवसीय क्रिकेटसाठी 6 हजार रुपये
सेंट्र कॉन्ट्रेक्टनुसार नेपाळच्या क्रिकेटर्सना महिन्याच्या पगाराव्यतिरिक्त प्रत्येक सामन्यासाठी अतिरिक्त मानधन दिलं जातं. एका एकदिवसीय सामन्यासाठी नेपाळ क्रिकेट संघातील खेळाडूंना 10 हजार रुपये मिळतात. तर एका टी20 सामन्यासाठी त्यांना 6 हजार नेपाळी करन्सी दिली जाते. भारततीय रुपयात हे मानधन 6286 आणि 3143 इतकं होतं.
पैसे कमी मिळत असले तरी नेपाळ क्रिकेट संघातील खेळाडूंचं स्वप्न मोठं आहे. एशिया कप स्पर्धेत क्वालिफाय होत या खेळाडूंनी हे सिद्ध केलं आहे.