Asia Cup 2022 : एशिया कप स्पर्धेत पाकिस्तानविरुद्धच्या (India vs Pakistan) हायव्होल्टेज सामन्यात टीम इंडियाचा (Team India) कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) प्लेईंग इलेव्हनमधून बाहेर काढलं. रोहितच्या या निर्णयावर आता भारतीय क्रिकेट वर्तुळात जोरदार टीका केली जात आहेत. विकेटकिपर म्हणून टीम इंडियात ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) जागी दिनेश कार्तिकला (Dinesh Kartik) संधी देण्यात आली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रोहितच्या निर्णयावर संतापला
टीम इंडियाचा माजी सलामीवीर गौतम गंभीर (Gautam Gambhir) कर्णधार रोहित शर्माच्या या निर्णयावर चांगलाच संतापला. ऋषभ पंतला वगळण्यावर गौतम गंभीरने आपली प्रतिक्रिया दिली आहे. 'मी या निर्णयाशी सहमत नाही. मी संघ निवडला असता तर दिनेश कार्तिकपेक्षा ऋषभ पंतची निवड केली असती असं गंभीरने म्हटलंय.


ऋषभ पंत प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणं हे फारच धक्कादायक होतं, ऋषभ पंत सध्या चांगलाच फॉर्मात आहे आणि अशा महत्वाच्या सामन्यात त्याला बाहेर ठेवण्याची चूक कोणत्याच कर्णधाराने केली नसती असं गौतम गंभीरने म्हटलंय. दुसरीकडे पाकिस्तानचा माजी कर्णधार वसीम अक्रमनेही (Vasim Akram) रोहितच्या या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केलं आहे. एशिया कप स्पर्धेनंतर टी-20 वर्ल्ड कप स्पर्धा आहे. ऋषभ पंत चांगला विकटकिपर आणि सुपरस्टार फलंदाज आहे. त्यादृष्टीने भारतीय संघाने भविष्याचं नियोजन करावं असं वसीम अक्रमने म्हटलं आहे. 


ऋषभ पंतने टी-20 वर्ल्ड कप 2021 च्या सामन्यात पाकिस्तानविरुद्ध कठीण परिस्थितीत 39 धावांची खेळी केली होती. अशा स्थितीत चाहत्यांना पुन्हा एकदा पंतच्या बॅटमधून धावा होण्याची अपेक्षा होती, पण ऋषभला प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात आलं, त्यामुळे चाहतेही चांगलेच निराश झालेत.