Asia Cup 2023 : एशिया कपला ( Asia Cup 2023 ) सुरुवात झाली असून पहिला सामना पाकिस्तान विरूद्ध नेपाळ आहे. तर सर्व चाहत्यांना उत्सुकता आहे ती, 2 सप्टेंबर रोजी होणाऱ्या भारत-पाकिस्तान ( India vs Pakistan ) सामन्याची. श्रीलंकेमध्ये हा हायव्होल्टेज सामना खेळवला जाणार आहे. मात्र या सामन्यापूर्वीच चाहत्यांना एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. हा धक्का म्हणजे, 2 सप्टेंबर रोजी होणारा भारत-पाकिस्तान सामना रद्द होण्याची शक्यता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यंदाचा एशिया कप जिंकण्यासाठी टीम इंडिया प्रबळ दावेदार मानली जातेय. या स्पर्धेत भारताचा पहिलाच सामना पाकिस्तानशी ( India vs Pakistan ) रंगणार आहे. या सामन्याची प्रत्येक चाहत्याला उत्सुकता आहे, मात्र यापूर्वी चाहत्यांच्या पदरी निराशा पडण्याची शक्यता आहे. 


भारत-पाकिस्तान सामना होणार रद्द?


भारत आणि पाकिस्तान ( India vs Pakistan ) सामन्यावर पावसाचं सावट असल्याचं म्हटलं जातंय. जवळपास 10 महिन्यांनंतर जगभरातील क्रिकेट चाहत्यांना भारत आणि पाकिस्तान ( India vs Pakistan ) यांच्यातील हाय व्होल्टेज सामना पाहण्याची संधी मिळणार आहे. परंतु पाऊस चाहत्यांची निराशा करण्याची शक्यता आहे. 


Accu Weather च्या अहवालानुसार, शनिवारी म्हणजेच 2 सप्टेंबर रोजी श्रीलंकेतील कॅंडी शहरात पाऊस पडण्याची शक्यता आहे. 2 सप्टेंबर रोजी श्रीलंकेतील कॅंडी शहरातील पल्लेकेले स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान ( India vs Pakistan ) यांच्यात शानदार सामना रंगणार आहे. मात्र या सामन्यावर पावसाची शक्यता असल्याने चाहत्यांच्या चिंतेत भर पडली आहे. 


World Weather Online ने 2 सप्टेंबर रोजी श्रीलंकेच्या कॅंडी शहरात पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे पावसाची बातमी चाहत्यांना निराश करू शकते. भारत आणि पाकिस्तानची ( India vs Pakistan ) टीम यापूर्वी 23 ऑक्टोबर 2022 रोजी T20 वर्ल्डकप 2022 च्या सामन्यात एकमेकांशी भिडल्या होत्या. या सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानचा 4 विकेट्स राखून पराभव केला होता. 


पाकिस्तानविरूद्ध कशी असेल टीम इंडिया


रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ईशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव.