Asia Cup 2023 : क्रिकेट जगतात वर्षभरात अनेक स्पर्धा, मालिकांचं आयोजन करण्यात येतं. असं असतानाच (team india) भारतीय क्रिकेट जगतावर नाही म्हटलं तरीही संपूर्ण जगाचं लक्ष असतं. अशा या क्रिकेटवर नितांत प्रेम असणाऱ्या देशात सध्या उत्सुकता लागून राहिली आहे ती म्हणजे आयपीएल 2023 (IPL 2023)ची. इथं आयपीएल सुरुही झालं नाही, तोच आणखी एका बहुप्रतिक्षित चषकाबद्दलची मोठी माहिती नुकतीच समोर आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यंदाच्या वर्षी आशिया चषकाचं (Asia Cup 2023) आयोजन करण्यासाठी भारत आणि पाकिस्तान ही दोन्ही राष्ट्र समोरासमोर उभी ठाकली होती. पण, आता त्यातूनच सुवर्णमध्य काढण्यात आला आहे. यंदाच्या वर्षी सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या या स्पर्धेचं आयोजन पाकिस्तानमध्ये करण्यात येणार आहे. आता तुम्ही म्हणाल पाकिस्तानमध्ये आशिया चषक असल्यास भारत सहभागी होणार का? तर, याचं उत्तर आहे हो. 


भारताचे सामने दुसऱ्या देशात होणार असल्याची माहिती मिळत आहे. क्रिकेटबद्दलची माहिती देणाऱ्या संकेतस्थळांच्या वृत्तानुसार (BCCI) बीसीसीआय आणि पीसीबीमध्ये (PCB) याबाबतची चर्चा झाली असून, हा मार्ग काढण्यात आला आहे. 


भारताचे सामने कोणत्या देशात? 


आशिया चषकादरम्यान भारताचे सामने नेमके कोणत्या देशात होणार आहेत हे मात्र अद्यापही स्पष्ट होऊ शकलेलं नाही. पण, युएई, ओमान, श्रीलंका (Sri Lanka) यांपैकी एका राष्ट्रात भारतीय संघाच्या सामन्यांचं आयोजन केलं जाऊ शकतं. इतकंच नव्हे, तर यामध्ये इंग्लंडचंही (Engalnd) नाव पुढे येत आहे. 


हेसुद्धा वाचा : 2023 World Cup: वर्ल्डकपच्या तारखा ठरल्या? 'या' दिवशी रंगणार अंतिम सामना


 


बीसीसीआयच्या सचिवपदी असणाऱ्या जय शाह (Jay Shah) यांनी टी20 वर्ल्ड कपच्या वेळी पाकिस्तानमध्ये भारतीय संघास पाठवणार नसल्याच्या आशयाचं वक्तव्य केलं होतं. त्यांनी आशिया कपचं आयोजन एखाद्या तटस्थ भूमिका असणाऱ्या राष्ट्रात व्हावं अशाही सूर आळवत सर्वांच्याच नजरा वळवल्या होत्या. परिणामी आगामी आशिया चषकात भारत आणि पाकिस्तानचाही सामना एखाद्या तटस्थ राष्ट्रामध्ये खेळवला जाऊ शकतो. 


एकदिवसीय विश्वचषकापूर्वी Asia Cup चं आयोजन 


ODI World Cup पूर्वी आशिया चषकाचं आयोजन केलं जाणार असून, इथंही 50 षटकांचा खेळ खेळला जाणार आहे. 2022 मध्ये ही स्पर्धा श्रीलंकेत पार पडणं अपेक्षित होतं. पण, त्यानंतर ती युएईमध्ये खेळवण्यात आली होती. तिथं 20 षटकांच्या Format मध्ये खेळवण्यात आलेल्या या स्पर्धेत श्रीलंकेनं बाजी मारली होती. 


भारत - पाकिस्तानच्या नात्यात कटुता... 


भारत आणि पाकिस्तान या दोन्ही राष्ट्रांमध्ये असणारी कटुता उघड आहे. 2008 मध्ये मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर या देशांमधील समीकरणं आणखी चिघळली ज्याचे परिणाम खेळावरही झाले.