Asia Cup: नुकतंच एशिया कपमध्ये ( Asia Cup 2023 ) भारत विरूद्ध श्रीलंका यांच्यामध्ये सामना रंगला होता. या सामन्यामध्ये टीम इंडियाने ( Team India ) 41 रन्सने श्रीलंकेचा पराभव केला. मात्र या सामन्यात एक अशी घटना घडली, ज्याबद्दल कदाचितच तुम्ही यापूर्वी ऐकलं असेल. श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यात सामना संपल्यानंतर अशा एक खेळाडूला अवॉर्ड मिळाला ज्याचा समावेश प्लेईंग 11 मध्ये नव्हताच. कोण आहे हा नेमका खेळाडू पाहूयात.


टीम इंडियाला मिळालं फायनलचं तिकीट


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडियाने ( Team India ) एशिया कप 2023 च्या फायनलमध्ये आपली जागा पक्की केलीये. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने एशिया कपच्या सुपर-4 फेरीत श्रीलंकेचा 41 रन्सने पराभव केला. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने ( Rohit sharma ) टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यानुसार, 49.1 ओव्हर्समध्ये त्याने 213 रन्स केले. त्यानंतर श्रीलंकेची टीम 41.3 ओव्हर्समध्ये 172 रन्समध्ये ऑलआऊट झाली. या विजयासह टीम इंडिया 11व्यांदा एशिया कपच्या अंतिम फेरीत पोहोचलीये.


प्लेईंग 11 मध्ये नसतानाही 'या' खेळाडूला मिळाला अवॉर्ड


एशिया कप स्पर्धेत आतापर्यंत सूर्यकुमार यादवला ( Suryakumar yadav ) टीम इंडियाच्या प्लेइंग-11 मध्ये संधी मिळालेली नाही. दरम्यान असं असूनही त्याच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्याला पोस्ट प्रेझेंटेशन सेरेमनीमध्ये पुरस्कार देण्यात आला. यावेळी जेव्हा टीम इंडिया फिल्डींगसाठी मैदानात उतरली तेव्हा सूर्यकुमार यादवने ( Suryakumar yadav ) पर्यायी फिल्डरची भूमिका बजावली. 


श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यामध्ये सूर्यकुमारने ( Suryakumar yadav ) 2 उत्तम कॅच घेतले. श्रीलंका फलंदाजी करत असताना 41व्या ओव्हरमध्ये हार्दिक पांड्याच्या बॉलवर सूर्याने एक कॅच घेतला. दरम्यान हा कॅच पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटलं. या कॅचसाठी सूर्यकुमारला सर्वोत्कृष्ट कॅचचा पुरस्कार देण्यात आला.


एशिया कपमध्ये रंगणार पाकिस्तान विरूद्ध श्रीलंका


भारत विरुद्ध श्रीलंका सामना झाल्यानंतर आशिया कप 2023 च्या पॉईंट टेबलमध्ये टीम इंडिया पहिल्या क्रमांकावर आहे. तर गुरुवारी एशिया कपमध्ये पाकिस्तान विरूद्ध भारत यांच्यात सामना रंगणार आहे. 14 सप्टेंबरला अंतिम फेरी गाठण्यासाठी पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात सामना रंगणार आहे. मात्र जर या सामन्यात पाऊस आला तर आणि सामना रद्द झाला तर दोन्ही टीमकडे 1-1 पॉईंट जाईल. म्हणजेच श्रीलंका आणि पाकिस्तान या दोन्ही टीमचे 3-3 पॉईंट्स होतील. अशावेळी नेटनेटच्या जोरावर दोघांपैकी एक टीम फायलन गाठेल.