Virat Kohli India vs Pakistan: एशिया कप स्पर्धेत (Asia Cup 2022) टीम इंडियाचा (Team India) माजी कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) पुन्हा एकदा सूर गवसला आहे. पुन्हा एकदा त्याच्या बॅटमधून धावा निघू लागल्या आहेत. एशिया कप स्पर्धेत खेळलेल्या तीन सामन्यात कोहलीने दोन अर्धशतकं केली आहेत. क्रिकेटप्रेमींनाही पुन्हा एकदा 'रणमशीन विराट' पाहिला मिळतोय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण सध्या विराट कोहली त्याच्या फॉर्ममुळे नाही तर त्याच्या एका वक्तव्याने चर्चेत आला आहे. पाकिस्तानविरुद्धचा (India vs Pakistan) सामना संपल्यानंतर विराटने एक वक्तव्य केलं, ज्यामुळे नवा वाद उभा राहण्याची शक्यता आहे. विराट कोहलीचा त्यावेळी वाईट काळ सुरु होता. धावा करण्यासाठी त्याला झगडावं लागत होतं. त्यावेळी त्याने कसोटी क्रिकेटचं (Test Captain) कर्णधारपद सोडण्याचं जाहीर केलं. यावेळी आपल्याला केवळ महेंद्रसिंग धोणीचा (MS Dhoni) मेसेज आला होता. त्याच्याशिवाय एकानेही आपल्या मेसेज केला नसल्याची खंत विराटने बोलून दाखवली आहे. 


एम एस धोणीने केला होता मेसेज
कसोटी क्रिकेटचं कर्णधारपद सोडण्याचा निर्णय माझ्यासाठी मोठा आव्हानात्मक होता. त्यावेळी मला केवळ एका व्यक्तीचा मेसेज आला, तो म्हणजे महेंद्रसिंग धोणी. माझा नंबर अनेक लोकांकडे आहे. टीव्हीवर अनेकजण सल्ले देत असतात. पण ज्यांच्याजवळ माझा नंबर आहे त्यातल्या एकालाही मला मेसेज करावा वाटला नाही. अशी खंत विराट कोहलीने व्यक्त केली. विराट कोहलीच्या या वक्तव्याने क्रिकेट विश्वात नवा वाद उभा राहण्याची शक्यता आहे.


टीका करणाऱ्यांना दिलं उत्तर
विराट कोहलीने टीका करणाऱ्यांनाही उत्तर दिलं आहे. काही जण जगासमोर सल्ले देतात. पण त्यांना माझ्या भल्यासाठी काही सांगायचं तर त्यांनी मला प्रत्यक्ष द्यायला हवा, मागे बोलून काय फायदा असं विराटने म्हटलं आहे. मी माझं आयुष्य इमानदारीने जगतो. क्रिकेटसाठी मी पूर्ण मेहनत करतो, आणि जोपर्यंत देशासाठी खेळेन तोपर्यंत मी माझं 100 टक्के देऊन खेळेन असं विराट कोहलीने सांगितलं.



पाकिस्तानविरुद्ध कोहलीचं अर्धशतक
सुपर 4 मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताने 7 विकेट गमावत 181 धावा केल्या. एकट्या विराट कोहलीचा वाटा होता 60 धावांचा. विराटने 44 बॉलमध्ये 60 धावा केल्या. यात त्याने 4 चौके आणि 1 सिक्स लगावला. या स्पर्धेतील त्याचं हे दूसरं अर्धशतक. आपल्या 


शेवटच्या ओव्हरपर्यंत रंगला सामना
भारत आणि पाकिस्तानदरम्यानचा सामना जबरदस्त चुरशीचा झाला. भारतीय क्रिकेट संघाने पाकिस्तान क्रिकेट संघासमोर विजयासाठी 182 धावांचं आव्हान ठेवलं होतं. विजयाचं हे आव्हान पाकिस्तानने 5 विकेट गमावत पुर्ण केलं. मोहम्मद रिझवानने 51 बॉलमध्ये 71 धावांची मॅचविनिंग खेळी केली.