दुबई : टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीचे करोडो चाहते आहेत. केवळ भारतातच नाही तर इतर देशांमध्येही त्याचे चाहते आहेत. भारताच्या शेजारी देश पाकिस्तानमध्येही कोहलीच्या चाहत्यांची कमतरता नाही. नुकतच लाहोरचा एक चाहता किंग कोहलीला भेटण्यासाठी आणि सेल्फी घेण्यासाठी दुबईला पोहोचला. मोहम्मद जिब्रान नावाच्या चाहत्यालाही निराश न होता कोहलीने त्याच्यासोबत सेल्फी काढला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही संपूर्ण घटना दुबईतील आयसीसी अकादमी मैदानावर घडली. सराव सत्रानंतर विराट कोहली टीमची बस पकडण्यासाठी परत जात असताना मोहम्मद जिब्रान धावत कोहलीच्या दिशेने आला. परंतु मैदानावर तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांनी त्याला रोखलं. विराट कोहलीही टीमच्या बसच्या दिशेने चालत राहिला. मात्र, नंतर भारताचा माजी कर्णधार जिब्रानला भेटला आणि त्याच्यासोबत सेल्फी काढला.


कोहलीबाबत काय म्हणाला फॅन


त्या पाकिस्तानी चाहत्याने PAK tv टीव्हीशी बोलताना सांगितलं की, "मी दुसऱ्या कोणाचा नाही पण कोहलीचा चाहता आहे. त्याला भेटण्यासाठी आणि फोटो काढण्यासाठी मी पाकिस्तानवरून इथे आलोय. मी यासाठी संपूर्ण महिना वाट पाहिली आहे."


जिब्रान पुढे म्हणाला, 'कोहली हा महान क्रिकेटपटू असण्यासोबतच एक महान माणूस आहे. त्याने माझं म्हणणं ऐकून घेतलं आणि सेल्फी घेण्याची माझी विनंती मान्य केली. मी विराट कोहलीसाठी खूप भावूक आहे. मी भारतीय खेळाडूंचा मोठा चाहता आहे. मी कधीही पाकिस्तानी खेळाडूंसोबत सेल्फी घेतलेला नाही. विराट कोहली हा माझा आदर्श आहे आणि तो नक्कीच फॉर्मात येईल. तो पाकिस्तानविरुद्ध 50हून अधिक रन्स करेल."


कोहलीचा सध्याचा फॉर्म खराब आहे


विराट कोहली सध्या फार खराब खराब फॉर्ममध्ये आहे. विराट कोहलीने शेवटचं आंतरराष्ट्रीय शतक 23 नोव्हेंबर 2019 रोजी झळकावलं होतं. आंतरराष्ट्रीय स्तरावर कोहलीचे हे 70 वं शतक होतं. अशा स्थितीत तो पाकिस्तानविरुद्ध चांगली कामगिरी करू शकेल, अशी अपेक्षा आहे.