जकार्ता : आशियाई स्पर्धा २०१८ मध्ये भारताला ११वं सुवर्ण पदक मिळालं आहे. स्वप्ना बर्मनला हेप्टाथलॉनमध्येमध्ये सुवर्ण पदक मिळालं. या स्पर्धेमध्ये भारताला आत्तापर्यंत ११ सुवर्ण पदकांबरोबर ५४ पदकं मिळाली आहेत. पदकं जिंकण्याच्या यादीमध्ये भारत आठव्या क्रमांकावर पोहोचला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्वप्ना बर्मननं बुधवारी हेप्टाथलॉनच्या शेवटच्या इव्हेंटमध्ये ८०० मीटरमध्ये तिसरं स्थान मिळवलं. याचबरोबर तिनं ६०२६ पॉईंट्ससह हेप्टाथलॉनमध्ये सुवर्ण पदक पटकावलं. याआधी अरपिंदर सिंग यानं भारताला दिवसातलं पहिलं सुवर्ण पदक मिळवून दिलं होतं. ट्रिपल जंपमध्ये अरपिंदरला सुवर्ण पदक मिळालं.