मुंबई : आपल्या अचूक भविष्यवाणीसाठी प्रसिद्ध असलेले नरेंद्र बुंदे पुन्हा चर्चेत आलेत. यावेळी त्यांनी भारताचा कर्णधार विराट कोहलीबाबत मोठी भविष्यवाणी केलीये.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघाला यश मिळेल अशी भविष्यवाणी नरेंद्र यांनी केलीये. इतकंच नव्हे तर कोहलीला भारतीय क्रीडा इतिहासातील सर्वात मोठा एंडोर्समेंट करार मिळणार आहे. नागपूरचे बुंदे यांनी याआधी सचिन तेंडुलकरबाबत केलेली भविष्यवाणी खरी ठरली होती.


त्यांनी सौरव गांगुलीचे पुनरागमन आणि भारतीय संघ २०११मध्ये वर्ल्डकप जिंकण्याबाबत केलेली भविष्यवाणी केली होती तीही खरी ठरली होती. तसेच ३६ वर्षीय माजी कर्णधार धोनी २०१९मध्ये इंग्लंडमध्ये होणाऱ्या वर्ल्डकपमध्ये तो संघात असणार असल्याचीही भविष्यवाणी त्यांनी केली होती.


कोहलीबाबत ते म्हणाले, कोहलीला लवकरच असा करार करणार आहे जो मार्क मास्करेनहासने सचिन तेंडुलकरसोबत केला होता. आजच्या काळातील हा सर्वात मोठा करार असेल. कोहलीचे शुक्र ग्रह मजबूत स्थितीत आहेत त्यामुळे परदेशात तो चांगली कामगिरी करेल.