Athiya Shetty and KL Rahul Love Story : ती भेट, मैत्री आणि प्रेम... अथिया आणि केएल राहुलची लव्ह स्टोरी
KL Rahul and Athiya Shetty आज अडकणार लग्न बंधनात... त्यांची ही लव्ह स्टोरी तुम्हाला माहितीये का?
Athiya Shetty and KL Rahul Love Story : अभिनेत्री अथिया शेट्टी (Athiya Shetty) आणि किक्रेट खेळाडू केएल राहुल (KL Rahul Wedding) आज सोमवारी 23 जानेवारी 2023 रोजी (Athiya Shetty and KL Rahul Wedding Date) सप्तपदी घेणार आहेत. अथिया आणि केएल राहुलच्या लग्नाच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. याचप्रमाणे त्यांची लव्ह स्टोरी देखील चांगलीच चर्चेत होती. चला तर जाणून घेऊया केएल राहुल आणि अथियाची लव्ह स्टोरी कशी सुरु झाली.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अथिया आणि राहुलच्या लव्हस्टोरीबद्दल बोलायचे झाले तर त्या दोघ्यांची पहिली भेट ही 2019 मध्ये एका कॉमन फ्रेण्डमुळे झाली होती. त्या दोघांना एकमेकांची कंपनी खूप आवडली. त्यानंतर ते एकमेकांशी बोलू लागले. मग हे फक्त बोलण्यापर्यंत थांबलं नाही तर ते लोक भेटू देखील लागले. त्यानंतर त्यांच्या भेटीगाठी वाढल्या हळूहळू मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले.
अथिया आणि केएल राहुलनं सोशल मीडियावर फोटो शेअर करत एकमेकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तेव्हा त्यांच्या नात्याची अफवा सुरु झाली. त्या दोघांच्या रिलेशनशिपविषयी सगळ्यात जास्त चर्चा तेव्हा सुरु झाली जेव्हा 2021 मध्ये राहुल टेस्ट सीरिज खेळण्यासाठी इंग्लंडला पोहोचला तेव्हा त्याच्यासोबत अथिया देखील होती. त्या दोघांनी याविषयी कोणतीही माहिती दिली नसली तरी देखील त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तर एकच खळबळ उडाली होती.
हेही वाचा : आईसाठी Rakhi Sawant चं मोठं पाऊल, केलेलं काम पाहून कराल कौतुकाचा वर्षाव
केएल राहुलनं 2021 मध्ये अथियाच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत त्यांच्या प्रेमाची कबुली दिली होती. अथियाच्या वाढदिवसानिमित्तानं केएल राहुलनं अथियासोबतचा एक फोटो शेअर करत रोमॅन्टिक कॅप्शन दिलं. यानंतर तर केएल राहुल अथियाचा भाऊ अहान शेट्टीच्या 'तडप' चित्रपटाच्या स्क्रिनिंगलाही पोहोचला होता. यावेळी त्या दोघांनी कपल म्हणून एकत्र फोटोही काढले. यावेळी दोघे पहिल्यांदा एकत्र दिसले होते.
त्यानंतर अथिया आणि केएल राहुलचे इंग्लंड टेस्ट सीरीज 2021 दरम्यानचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. हे पाहता अथिया शेट्टीचे वडील आणि अभिनेता सुनील शेट्टीला याविषयी विचारण्यात आले असता त्यांनी यावर बोलण्यास नकार दिला होता. तर या सगळ्या अफवा असल्याचे म्हणत त्यांनी फेटाळले होते. केएल राहुल आणि अथियाला त्यांचे रिलेशनशिप हे लाइमलाइटपासून दूर ठेवले होते.