आईसाठी Rakhi Sawant चं मोठं पाऊल, केलेलं काम पाहून कराल कौतुकाचा वर्षाव

Rakhi Sawant चा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओत राखीनं हे नवीन रूप पाहून नेटकऱ्यांना आश्चर्य झाले आहे. 

Updated: Jan 23, 2023, 10:56 AM IST
आईसाठी Rakhi Sawant चं मोठं पाऊल, केलेलं काम पाहून कराल कौतुकाचा वर्षाव title=

Rakhi Sawant In NGO : बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंतच्या (Rakhi Sawant) आयुष्यात सतत कोणत्या ना कोणत्या गोष्टी घडत असल्याचे आपल्याला पाहायला मिळतय. सगळ्यात आधी राखीनं बॉयफ्रेण्ड आदिल खानशी लग्न केलं त्यानंतर तिच्या आईला रुग्णालयात दाखल करण्यात आला. दरम्यान, आता राखीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत राखी NGO मध्ये पैसे वाटताना दिसत आहे. राखीच्या आईसाठी लहान मुलांनी देखील प्रार्थना करावी म्हणून NGO मध्ये हजेरी लावली होती. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

राखीचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीनं शेअर केले आहेत. एका व्हिडीओत राखी या एनजीओमधल्या मुलांना चिप्स, कुरकुरे आणि लेसचे पॅकेट देताना दिसत आहे. त्यानंतर राखी तिथल्या मुलांना बोलते की माझ्या आईसाठी प्रार्थना करा. मग राखी त्या मुलांसोबत मिळून केक कापते. दरम्यान, तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. याशिवाय राखीचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत राखीच्या हातात 500 रुपयांच्या नोटेचं एक बंडल असल्याचे दिसत आहे. त्यानंतर राखी हे पैसे एनजीओमध्ये असलेल्या मुलांना वाटते. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

या व्हिडीओत राखी बोलताना दिसते की प्रार्थना आणि औषध दोघं एकत्र कोणत्याही व्यक्तीला वाचवू शकतात. मी पण तर इथेच लहानाची मोठी झाले आहे ना. त्यानंतर राखी थोडी भावूक होते. त्यानंतर राखी त्या मुलांना पैसे दिल्यानंतर बोलते की माझ्या आईसाठी प्रार्थना करा. यावेळी राखीनं गुलाबी रंगाचा एक ड्रेस परिधान केला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

नुकतीच, राखी तिच्या आईला भेटण्यासाठी रुग्णालयात आली होती. रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर पापाराझींशी संपर्क साधनाता राखी अचानक रडू लागली आणि म्हणाली, माझ्या आयुष्यात इतकी दु:खं आहेत की ती कोणाच्याही आयुष्यात येऊ नयेत असं ती म्हणते. हे पाहून सोशल मीडियावर नेटकरी तिला ट्रोल करू लागले आहेत. 

राखीची आई ब्रेन ट्युमरशी झुंज देत असून क्रिटिकेअर (Criticare) रुग्णालयात उपचार घेत आहे. आईला भेटण्यासाठी राखी रुग्णालयात जात असतानाचा तिचे असे बरेच व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. दरम्यान, तिच्या आईच्या मदतीसाठी मुकेश अंबानी धावून आले होते. त्यांनी राखीला आर्थिक मदत केली होती.